राजकारण

अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचा भाजपचा शब्द; भाजप नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

अजित पवार यांनी शिंदे-फडणवीसांना साथ देत राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : अजित पवार यांनी शिंदे-फडणवीसांना साथ देत राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला. उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवारांनी घेतली असली तरी त्यांना मुख्यमंत्री पदाचा भाजपचा शब्द असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. यावर आता भाजप नेते संजय काकडे यांनी मोठे विधान केले आहे.

काय म्हणाले संजय काकडे?

अजित दादांच्या मदतीने २०२४ ला बारामती भाजप काबीज करणारच. आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचा भाजपला मोठा फायदा होणार असून अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचा भाजपकडून शब्द असल्याचे मी ऐकलं आहे, असा गौप्यस्फोट संजय काकडे यांनी केला आहे. तरीही विधानसभा निवडणुकीत ज्याच्या जागा जास्त येतील त्याचाच मुख्यमंत्री होईल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, अजितदादा सोबत आले असले तरी पुणे महानगरपालिका निवडणूक भाजप स्वतंत्रच लढणार आहोत. आरपीआयला सोबत घेऊनच स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा