संजय राऊतांची आज दुपारी 4 वाजता पुन्हा पत्रकार परिषद 
राजकारण

आयकर छाप्यातील त्या डायरीत मातोश्रीचा उल्लेख, अजित पवार, संजय राऊत म्हणतात..

Published by : Jitendra Zavar

शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्याकडे नुकतेच आयकर विभागाला (income tax)टाकलेल्या छाप्यात एक डायरी सापडली. या डायरीत असलेल्या 'मातोश्री'च्या (Matoshree) उल्लेखामुळे राजकीय क्षेत्रात वेगळीच चर्चा सुरु झाली. महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे. शेवटी त्या उल्लेखावल शिवसेना नेते संजय राऊत व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना खुलाशा करावा लागला.

शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या डायरीत दोन कोटी आणि 50 लाखांचं घड्याळ दिलं असल्याचा उल्लेख आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्टीकरण दिलेआहे. ते म्हणाले की, 'मातोश्री'ला म्हणजे आईला असू शकत शकत नाही का?. आपल्याकडे दानधर्म करण्याची एक परंपरा आहे. मी त्यांचे वक्तव्य पाहिलं. त्यांनी आईला दान धर्मासाठी काही पैसे दिले असतील, असा दावा संजय राऊत यांनी केला.

काय म्हणाले अजित पवार

अजित पवार म्हणाले की, यशवंत जाधव यांनी आपल्या जबाबात सांगितले की, मी माझ्या आईला मातोश्री म्हणतो. बरेच जण स्वतःच्या आईला मातोश्री म्हणतात. काही जण आई म्हणतात तर काही मातोश्री म्हणतात. ते स्वतः जर असे सांगत असताना तुम्हा त्याला अधिक उकळी देण्याचे काम का करत आहात.

कोण आहेत यशवंत जाधव
२५ फेब्रुवारीला प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यात ही डायरी सापडली होती. यशवंत जाधव हे मुंबई मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत, तर त्यांच्या पत्नी यामिनी जाधव या भायखळा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द