राजकारण

Sanjay Raut : शिवसेना नसती, तर अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झाली नसती

ठाकरे गटाचं आज नाशकात राज्यव्यापी अधिवेशन होत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

नाशिकमध्ये ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाला ठाकरे गटाचे सर्व खासदार आणि आमदार उपस्थित आहेत. या अधिवेशनात संजय राऊत बोलत होते. भारताचं वातावरण राममय झालं आहे. राममय वातावरणात ठाकरेंनी महाशिबिराची मशाल पेटवली. श्रीरामाशी आमचं जुनं आणि जिव्हाळ्याचे नातं. शिवसेना नसती तर काल अयोध्येत रामाची प्राणप्रतिष्ठा झाली नसती. शिवसेनेच्या वाघांमुळे काल पंतप्रधानांना पूजा करता आली. रामाशी नातं कुणा एका व्यक्तीचं किंवा पक्षाचं नसतं. जो राम अयोध्येत आहे तोच राम इथं पंचवटीत आहेत. रामाचा जो संयम तो उद्धव ठाकरेंचा संयम. शिवसेनेच्या वाघांमध्ये धैर्य होतं म्हणून बाबरी पाडली. प्रभू श्रीरामाचा सर्वात मोठा संघर्ष नाशिकच्या पंचवटीत. दिल्लीतील रावणशाही समोर झुकणार नाही.

रामाचं अयोध्येत स्वागत झालं तसं उद्धव ठाकरेंचं स्वागत कल्याणमध्ये झालं. शिवसेनेचं रामाशी भावनिक नातं. ज्या ठिकाणी हे अधिवेशन होतय हे धर्मक्षेत्र आहे. कुरुक्षेत्र सुद्धा आहे. जी लढाई आपण सुरु करतोय ती इथून करतो आहोत. रामावर कुणाचाही अधिकार नाही. आम्ही आमच्या रामाचं पूजन करु तुम्ही तुमच्या विष्णूचं पूजन करा. या संपूर्ण देशाला मशाल प्रकाशित करेल. उद्धव ठाकरे फक्त संधीची वाट पाहत आहेत. संयमीयोध्दा ही उपाधी उद्धव ठाकरे शोभून दिसतं. राम जेव्हा संघर्ष करुन वनवासातून बाहेर आला तेव्हा तो भगवान झाला. आमची सुद्धा वेळ येईल. राम ज्यांना सोबत घेऊन गेले ते सामान्य माणूस होते. रामाचा पदोपदी अपमान झाला. सध्याचा रावण अजिंक्य नाही.

आपण सर्व हनुमान आहोत हे लक्षात ठेवा. आज दिल्लीत आणि महाराष्ट्रात रावण. शत्रूचा आत्मविश्वास कमी केला पाहिजे. आज सर्वत्र रावण. रामाचे धैर्य हे असत्याविरोधात पुकारलेलं आहे. रामाचे धैर्य हे रामराज्यात हुकूमशाहीचा पराभव व्हावा आणि लोकशाही स्थापन व्हावी अन्याय दूर व्हावा यासाठीचे धैर्य मी मानतो. शिवसेनेचा जो आत्मा आहे तो रावणाच्या पराभवात आहे. आपल्याला महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत रावण दिसत आहे.

आजची लंका पेटवायला किती वेळ लागतो. हनुमानाची शेपटी, तेल रावणाचे, आणि जळालं रावणाच घर. तुझ्या पैशानेच तुझी वाट लावली. याला म्हणतात लीडरशिप क्वालिटी. उद्धवजी हे सर्व हनुमान इथे बसलेले आहेत. लंकेला आग लावायला किती वेळ लागणार आहे. आमच्या भाग्यात आहे ते आम्ही लढून मिळवू. आम्ही जिंकू आणि जे राज्य हिसकवण्याचे प्रयत्न केले आहेत. जो आम्ही भगवा फडकवला त्यापेक्षा मोठा झेंडा फडकवू. असे राऊत म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा