संजय राऊतांकडून अजित पवारांचा पिंक सरडा असा उल्लेख करण्यात आला आहे. पिंक सरडा बारामती सोडणार असं ऐकल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे. गुलाबी रंग महाराष्ट्राला लाभदायी नाही आहे असं राऊतांनी म्हटलं आहे. राज्यात भगवा जिंकेल किंवा तिरंगा जिंकेल, पिंक कधीच जिंकणार नाही असं राऊतांनी म्हटलं आहे.
सुप्रियाताई लाडकी बहिण आहे महाराष्ट्राची आणि या बहिणीसाठी महाराष्ट्र लढला. महाराष्ट्राचे तुमचे जे भाऊ आहेत लाडके त्यांनी रंग बदलला. ते काय पिंक झाले. सरडा रंग बदलतो. अचानक पिंक कसा होऊ शकतो आणि आता हा पिंर सरडा बारामती सोडणार असं मी ऐकलेलं आहे. कुठे जाणार हे मला माहित नाही पण हे सांगतो, गुलाबी रंग महाराष्ट्राला लाभदायी नाही. आमचे बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे आम्हाला तिरंगाचे रक्षण जर कोणी करेल तर भगवा करेल आणि आम्ही करतो आहोत. त्याच्यामुळे आता पिंकची काळजी नाही पिंक गेला. आता आपल्याला राम कृष्ण हरी वाजवा तुतारी असे संजय राऊत म्हणाले.
याचसंदर्भात भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आशिष शेलार म्हणाले की, सरडा सुद्धा आत्महत्या करेल एवढे रंग संजय राऊतांनी बदलले. खरंतर सरडा आत्महत्या केल्याची केस त्यांच्यावर रजिस्टर होईल. प्रमुख आरोपी कोण संजय राजाराम राऊत. जर सरडाच्या परिवाराने तक्रार केली तर कारण ते उद्धवजींसोबत आहेत की पवार साहेबांसोबत महाराष्ट्राला माहित नाही. ते राहुल गांधींचे मित्र आहेत की आदित्यजींचे महाराष्ट्राला माहित नाही. त्यामुळे सरडा शिरोमणी ही पदवी संजय राऊत यांना आम्ही देतो असे आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे.