राजकारण

"बारामतीत अजित पवारांकडून धमक्या दिल्या जात आहेत", संजय राऊतांचा अजित पवारांवर गंभीर आरोप

उज्ज्वल निकम हे जरी भाजपचे उमेदवार असले तरी ती जागा महाविकास आघाडीचा उमेदवार 100% जिंकेल.

Published by : Dhanshree Shintre

मी खात्रीने सांगतो, उज्ज्वल निकम हे जरी भाजपचे उमेदवार असले तरी ती जागा महाविकास आघाडीचा उमेदवार 100% जिंकेल. माझ्या माहितीनुसार त्या मतदारसंघात भाजपचे अनेक प्रमुख नेते उमेगवारी घेण्यास नकार दिला. ज्या भागात कोण उमेदवारी घेण्यास तयारच नाही. उज्ज्वल निकम यांनी खरं म्हणजे जळगावमधून उमेदवारी घ्यायला पाहिजे होती असं मला वाटतं. पण अर्थात तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी उमेदवारी स्वीकारली आहे आणि नक्कीच कित्येक लढत चांगली होईल असे संजय राऊत म्हणाले आहेत.

या मुंबईमध्ये अद्याप दोन ठिकाणी उमेदवारी जाहीर करु शकले नाही. आपल्याला माहित असेल मला वाटतं दक्षिण मुंबई त्यानंतर वायव्य मुंबई ज्याला आम्ही म्हणतो जिथे अमोल किर्तीकर उभे आहेत तिथे उमेदवारी नाही अद्याप जाहीर केली. ठाणे मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला तथाकथित तिथे उमेदवारी जाहीर केलेली नाही. कल्याण, डोंबिवलीमध्ये सुद्धा अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झालेली नाही. शिंदे-फडणवीस गटानं नाशिकला सुद्धा उमेदवार दिलेला नाही. तो शिंदे गट नाही तो फडणवीस गट आहे आणि ती मोदी शाह प्रायवेट लिमिटेड आहे. काही ठिकाणी फक्त औपचारिकता म्हणून उमेदवारी दिलेली आहे. कोणीही कितीही मोठ्या मोठ्या घोषणा करु द्या जिंकण्याची एवढीच तुम्हाला खात्री असेल तर अनेक मतदार संघात फडणवीस आणि अजित पवार धमक्या कोणाला देतायेत. काल सोलापूरात उत्तम जानकरांच्या नावाने धमकी देण्यात आली उटीचं काम करा नाहीतर तुरुंगात टाकू वैगेरे ज्या धमक्या सुरु आहेत ना तुम्हाला जिंकण्याची एवढी खात्री आहे ना एक अकेला सबपर भारी नरेंद्र मोदी मग धमक्या कशाला देताय, लोकशाही आहे ना लोकांना ठरवू द्या.

या बारामती शिरुर मतदारसंघामध्ये स्वतः अजित पवार जाहीरपणे धमक्या देत आहेत. व्यापारी, उद्योजक हे सगळे काम करणारे लोकं आहेत त्यांना नोटीसा मारणं, त्यांना बोलावून दंड आकारण्याचा धमक्या देणं 50 कोटी, 20 कोटी त्या नोटीसा पाठवायच्या मग सांगायचं माझं काम करायचं, माझ्या पत्नीचं काम करायचं, याचं काम करायचं नाहीतर तुला 50 कोटी भरावे लागतील. या धमक्या कशा करता मी बघून घेईन काय? ही लोकशाही आहे नरेंद्र मोदी असतील, अमित शाह असतील, फडणवीस असीतल, अजित पवार असतील ही भाषा जर तुम्ही करत असाल तर या राज्यांच्या जनतेने ठरवलेलं आहे काय करायचं ते तुमच्या धमक्यांना लोकं भीक घालतील पण जनता हा दबाव जुगारणार नाही असे संजय राऊत म्हणाले.

ज्या मोदींनी निवडणुक आयोग सगळ्या घटनात्मक संस्था आपल्या पायाखाली घेतलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून शिवसेना फडणवीस गट स्थापन केला हा आणि आम्हाला सांगतात नकली 4 जूननंतर याचं उत्तर जनता देईल मी आता सांगतो आणि आम्ही देऊ. 4 जूनला आम्हाला मोदींनी हा प्रश्न विचारावा कोण असली, कोण नकली आणि कोल्हापूरात येऊन प्रश्न करावा.

बावनकुळेंना लोकशाही माहित आहे का? ज्या बावनकुळेंना 2019 ला तिकिट नाकारलं त्यांनी लोकशाहीवर बोलू नये. तुमचे अजित पवार, फडणवीस ज्याप्रकारे मतदानाला धमक्या देत आहेत हे लोकशाहीत बसतं आहे का? त्यांना विचारा जरा ज्या विदर्भातून बावनकुळे येत आहेत, नागपूरसह सर्व जागांवर महाविकास आघाडी चांगल्या प्रकारे विजय प्राप्त करते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा