राजकारण

Sanjay Raut : त्यांना हे अधिकारी कोणी दिले? राऊतांनी दीपाली सय्यद यांना सुनावलं

"दिपाली सय्यद अभिनेत्री आहेत. त्या पक्षाचं काम करतात. त्यांना हे अधिकार कोणी दिले याची मला माहिती नाही. त्या शिवसेनेच्या नेत्या नाहीत. पदाधिकारी आहेत. तसंच प्रवक्त्या देखील नाहीत. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारची वक्तव्यं खूप काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे"

Published by : Shweta Chavan-Zagade

Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसात एकापेक्षा एक मोठे भूकंप होत आहेत. यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) एकत्र येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. अशातच शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांच्या ट्वीटनंतर ही चर्चा जास्तच जोरात होऊ लागली आहे. यावर आता खासदार संजय राऊतांनी (sanjay raut) स्पष्टीकरण दिलं आहे.

"दिपाली सय्यद अभिनेत्री आहेत. त्या पक्षाचं काम करतात. त्यांना हे अधिकार कोणी दिले याची मला माहिती नाही. त्या शिवसेनेच्या नेत्या नाहीत. पदाधिकारी आहेत. तसंच प्रवक्त्या देखील नाहीत. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारची वक्तव्यं खूप काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे", असं संजय राऊत म्हणाले. तसेच हे एकत्र होईल का हे येणारा काळ ठरवेल. ते आमचेच सहकारी, आमचेच मित्र आहेत. इतकी वर्ष आम्ही काम केलेलं आहे. तर एकत्र यावं असं का वाटणार नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

मंत्रिमंडळावरुन बोलताना ते राऊत म्हणाले की, आमचे मंत्री सात होते, दोघे नव्हते. इथे गेल्या पंधरा दिवसापासून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची कॅबिनेट दोघांमध्ये होत आहे. भाजपमध्ये घटना तज्ञ, कायदे तज्ञ यांची फार मोठी फौज आहे. त्याची पीसं काढतील. पण यात नैतिकता कुठे आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, तुमच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे शपथविधी करू शकला नाही. यांना मंत्रिपदाची शपथ घेण्याचा अधिकार राहिलेला नाही. घटना तुडवायची ठरवलं असेल तर मग तुमची मर्जी असंही राऊत म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?