राजकारण

Sanjay Raut On Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांनी एकतर्फी युती तोडण्याची घोषणा केली; संजय राऊत यांचं विधान

माननीय प्रकाश आंबेडकर यांनी एकतर्फी युती तुटल्याची घोषणा केली हे दुर्देव आहे. दोन नेत्यांमध्ये चर्चा होणं गरजेचं होतं.

Published by : Dhanshree Shintre

आता जनतेला रोज शिमगा पाहायला मिळतो. हा शिमगा जा काही सुरु आहे पक्ष फोडीचा, आरोप-प्रत्यारोपाचा, चिखलफेकीचा, अटका, बेकायदेशीर हा शिमगाच आहे. हा लवकर संपेल अशी मला अपेक्षा आहे. महाराष्ट्रामध्ये शिमग्याला फार महत्त्व आहे. होळी ही या राज्यातील वेगळी आहे इतर प्रांतातील वेगळी आहे. या होळीमध्ये अनेक अमंगल गोष्टींचं दहन केलं जातं. या महाराष्ट्रामध्ये अनेक अमंगल गोष्टींचा उदय झाला आहे. या महाराष्ट्रावर अनेक संकट येत आहेत असे संजय राऊत म्हणाले.

संविधान वाचावणं हे काळाची, देशाची राष्ट्राची नव्हे तर देशाची गरज आहे. भारतातील संविधान हे जगासाठी आदर्श संविधान आहे. हे देशातील सरकार रोज संविधानावर घाव घालतंय. या संविधानाला धोका सर्वात जास्त राज्य कर्त्यांपासून आहे. त्यामुळे संविधान वाचवणं आणि संविधानावर जे हल्ला करत आहेत त्यांचं त्या होळीमध्ये दहन करणं हे आमचं राष्ट्रीय कर्तव्य आहे असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर महायुती झाली त्याला जवळ-जवळ दीड वर्ष झाला आणि ती अत्यंत चांगल्या हेतूने झालेली युती होती. त्यात लोकसभेचा विचार झाला नव्हता. विधानसभा आणि महानगरपालिका या संदर्भात एकत्र काम करता येईल आणि महाराष्ट्रात सध्या जे सुरु आहे त्यावर एकत्र लढता येईल. ही तेव्हा दोन नेत्यानीमधली भूमिका होती. स्वःत माननीय उद्धव ठाकरे हे आंबेडकर भवनात जाऊन माननीय प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर घोषणा केली तेव्हा महाराष्ट्रामधल्या सर्व समाजामध्ये एक चैतन्याची लाट उसळली. ठाकरे आणि आंबेडकर यांचं नातं फार जुनं आहे ते एकत्र आले त्याचा आनंद महाराष्ट्रातील तमाम जनतेला झाला. त्यावेळेला ही युती करताना राजरकरण कमी आणि महाराष्ट्रातील समाजकरण जास्त करावं ही भूमिका होती. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते त्यावेळी आनंदी होते.

माननीय प्रकाश आंबेडकर यांनी एकतर्फी युती तुटल्याची घोषणा केली हे दुर्देव आहे. दोन नेत्यांमध्ये चर्चा होणं गरजेचं होतं. प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे घटक आहेत. आम्ही लोकसभेच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. आम्ही त्यांना ४ जागांचा प्रस्ताव दिला. हा ४ जागांचा प्रस्ताव कायम आहे. आम्हाला आजही वाटतं राज्याच्या नाही तर देशाच्या हितासाठी डॉ. आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलं संविधानाचं, मजबूत लोकशाहीचं ते संविधान आणि लोकशाही संकटात असताना आंबेडकरांसारख्या वारसदारांनी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेणं गरजेचं आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा