राजकारण

समृद्धी महामार्ग घाईत बनवून शिंदे-फडणवीसांनी श्रेय घेतलं, पण...; राऊतांचा घणाघात

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. यात 12 जणांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी झाले आहेत. यावर राज्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. समृद्धी महामार्ग घाईत बनवून शिंदे आणि फडणवीसांनी श्रेय घेतलं. पण, अपघातांची जबाबदारी कुणी घ्यायला तयार नाही, असा घणाघात राऊतांनी केला आहे.

समृद्धी महामार्ग हा मुळात चुकीच्या पद्धतीने निर्माण केलेला आहे. हा महामार्ग निर्माण करताना जनतेच्या सुरक्षेपेक्षा ठेकेदारांचे हित त्यातून कोट्यवधीचा मलिदा या पलीकडे या समृद्धी महामार्गाकडे पाहिले नाही. समृद्धी महामार्ग बनवत असताना शेतकरी लहान उद्योजक यांचा हित पाहिलं नाही. जमिनी ओरबाडून घेतल्या. फळबाग, रस्त्यावरील उद्योग उद्धवस्त करण्यात आले त्यांचे शाप आहेत. समृद्धी महामार्ग घाईत बनवून शिंदे आणि फडणवीसांनी श्रेय घेतलं. पण, अपघातांची जबाबदारी कुणी घ्यायला तयार नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

इतका रखरखीत महामार्ग या जगात कुठे दिसत नाही. कुठे थांबा नाही, कुठे लोकांना विश्रांतीची जागा नाही. आम्ही मागेच सरकारवरती सदोष मनुष्यवराचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी आम्ही केली होती. रोज लोकांच्या हत्या होतात. सरकारी हत्या होतात. मग, आम्ही संबंधित मंत्र्यांवरती कारवाईची मागणी का करू नये, असा सवाल त्यांनी विचारला आहे. संबंधित मंत्र्यांवरती सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे, अशी मागणी राऊतांनी केली आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ हे राजकारण करतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांनी सर्वांनी आपली जुनी वक्तव्यं आधी तपासून घ्यावी. फडणवीस म्हणत होते कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देऊ, एकनाथ शिंदे म्हणत होते मी मुख्यमंत्री होईल आणि लगेच मराठा समाजाला आरक्षण देईल. मराठा समाज लाखोच्या संख्येने रस्त्यावरती उतरला आहे. भुजबळ यांची वक्तव्यं ही महाराष्ट्राच्या समाजामध्ये फूट पाडणारे आणि आग लावणारी आहे हा विषय अत्यंत संयमाने हाताळला पाहिजे, असा निशाणा राऊतांनी भुजबळांवर साधला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Resham Tipnis : लेकाचा फोटो वापरल्याने एकच गोंधळ, अभिनेत्री संतापली म्हणाली की, 'ज्याने हे वाईट...'

NEET-UG 2025 : निकालांविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर