राजकारण

Sanjay Raut : SIT हा शब्द देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात शोभत नाही

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Published by : Siddhi Naringrekar

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत म्हणाले की, बदलापूरमध्ये ज्या शाळेमध्ये ही घटना घडली. ती शाळा भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहे. दुदैवाने ती दुसऱ्या कोणत्या पक्षासी सहमत असती तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे महिला मंडळ हे त्या शाळेच्या पायरीवर जाऊन बसले असते बोंबा मारत. आता गेले का? नाही.

जनतेचा काल उद्रेक होता. देवेंद्र फडणवीस यांनी SIT स्थापन केली अशी घोषणा केली. काय गरज आहे? आरोपी पकडला आहे ना. पोलिसांनी तपास केला आहे ना. SIT हा शब्द त्यांच्या तोंडात शोभत नाही.

ठाकरे सरकारने अनेक गुन्हांमध्ये ज्या SIT स्थापन केल्या होत्या त्या गृहमंत्री झाल्याबरोबर पहिल्या 24 तासांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या SIT रद्द केल्या. याचा अर्थ तुम्ही SIT मानायला तयार नाही. सरकारची मानसिकता ही प्रधानमंत्री मोदींची मानसिकता आहे. हे मी अत्यंत जाणीवपूर्वक बोलतो आहे. असे संजय राऊत म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा