संजय राऊत आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, EVM ने सगळ्यांचे निकाल लावलेले आहेत. त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा पक्षबांधणी. महानगरपालिका निवडणुका येतील. विधानसभेचा जो निकाल आहे. त्या निकालावर चिंतन करण्यापेक्षा पुढे जायला पाहिजे. वर्षानुवर्षे आम्ही निवडणुका लढतो आहे. पण अशाप्रकारच्या निवडणुका 10 वर्षामध्ये जे आम्ही पाहतोय ज्या पद्धतीने निवडणुका लढवल्या जात आहेत. हे आम्ही कधी पाहिले नव्हते.
महाराष्ट्रात असेल देशात असेल लाखोंच्या संख्येने आम्हाला मतदान झालेले आहे. ज्याने आम्हाला मतदान केलं पण ते मतदान आम्हाला मिळालेले नाही. अशासुद्धा लोकांच्या शंका आहेत. आम्ही तुम्हालाच मतदान केलं. म्हणून मग त्या मारकडवाडीसारख्या ठिकाणी लोकांनी पुन्हा मतदान घ्या अशाप्रकारे मागण्या केलेल्या आहेत.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी ही अद्याप आहे. या ज्या चर्चा सुरु आहेत. स्वबळावर लढण्याच्या त्या आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर युतीमध्ये होतो तेव्हा ही स्थानिक स्वराज्य संस्था लढताना स्वबळावर लढाव्या किंवा जिल्हा परिषदा स्वबळावर लढाव्या अशी कार्यकर्त्यांची मागणी आणि भूमिका कायम असते कारण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असते, लोकसभेला कमी असते. विधानसभेला परत वाढते. जेव्हा आघाडी असते दोन किंवा तीन पक्षाची तेव्हा असे होत असते. आपल्या देशामध्ये ज्याच्या हातामध्ये EVM त्याची लोकशाही. असं समीकरण झालेलं आहे. पण ठिक आहे यातून मार्ग निघेल पुढे जाऊ. असे संजय राऊत म्हणाले.