राजकारण

नितीन गडकरींच्या दाव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; स्वातंत्र्य आणि लोकशाही टिकवायची असेल तर...

नितीन गडकरी हे भारतीय जनता पक्षाचे सर्व मान्य असे नेते आहेत आणि पंतप्रधान पदासाठी तडजोड करा असं त्यांना कोणी सांगितलं असेल असा मला वाटत नाही.

Published by : Dhanshree Shintre

नितीन गडकरी हे भारतीय जनता पक्षाचे सर्व मान्य असे नेते आहेत आणि पंतप्रधान पदासाठी तडजोड करा असं त्यांना कोणी सांगितलं असेल असा मला वाटत नाही. मुळात या देशात ज्या पद्धतीची हुकूमशाही, एखाधिकारशाही सुरू आहे ज्या पद्धतीने एका पद्धतीने आणीबाणी लावण्याचा प्रयत्न सुरू केला दहा वर्षापासून सुरू आहे त्याच्याशी तडजोड करू नका. त्या प्रवृत्तीची तडजोड करू नका. ही भूमिका त्यांच्या कडे कोणी जर मांडली असेल विरोधी पक्षाचा प्रमुख नेत्याने त्यात चुकीचं असं आहे मला वाटत नाही असे संजय राऊत म्हणाले.

आज जे सरकारमध्ये बसून सध्याच्या या देशातल्या मूल्यांशी तडजोड करत आहेत लोकशाही असेल, स्वातंत्र्य असेल, न्यायपालिका असेल तो एक राष्ट्रीय अपराध आहे असे मी मानतो आणि नितीन गडकरी या सगळ्याच्या विरुद्ध सातत्याने बोलत राहिले, आवाज उठवत राहिले, आपल्या भूमिका मांडत राहिले म्हणून जर त्यांना कोणी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्याने ज्या नेत्याला ते फार मानतात त्यांनी जर हा त्यांना सल्ला दिला असेल त्याच्यामध्ये फार पिढा होण्याचं कारण नाही कोणाला असे संजय राऊत म्हणाले.

जगजीवन राम यांनी 1977 साली काँग्रेस पक्षातून याच मूल्यांसाठी बंड केलं होतं आणि इंदिरा गांधीचा पराभव झाला होता. जर देशात स्वातंत्र्य आणि लोकशाही टिकवायची असेल न्यायपालिकेचे स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर काही जणांना सत्तेतल्या त्याग करावा लागतो तो त्याग केला म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळाले असे संजय राऊत म्हणाले.

नितीन गडकरी म्हणाले...

पण त्याने मला सांगितले होते की, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, सहकार्य करु. त्यावर मी त्यांना विचारलं की तुम्ही मला पंतप्रधान पदासाठी का पाठिंबा देणार आणि तो पाठिंबा मी का घ्यावा? मी त्या नेत्याला स्पष्टपणे सांगितलं की, पंतप्रधानपद हे माझ्या आयुष्यातील ध्येय नाही. मी माझ्या तत्वांशी आणि पक्षसंघटनेशी एकनिष्ठ आहे. मी पंतप्रधानपदासाठी तत्त्वांशी आणि पक्षाशी प्रतारणा करणार नाही. ही तत्त्वं हीच भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे असं नितीन गडकरी म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा