Devendra Fadnavis sanjay raut  Team Lokshahi
राजकारण

'ईडी आमच्या हातात दिली तर देवेंद्र फडणवीससुद्धा आम्हाला मतदान करतील'

Sanjay Raut यांचा भाजपवर निशाणा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यसभेवर भाजपचा (BJP) विजय झाल्यानंतर शिवसेनेना चांगलीच आक्रमक झाली आहे. परंतु, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पराभवाचे खापर आज भाजप आणि ईडीवर फोडले आहे. तसेच, आमच्या हातामध्ये दोन दिवस ईडी दिली तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सुध्दा शिवसेनेला मतदान करतील, असा दावा त्यांनी केला.

मतफुटींच्या आरोपांनंतर अपक्ष आमदारांनी नाराजी दर्शवली आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, आम्ही केवळ आमच्या भावना व्यक्त केल्या आहेत. कोणत्याही आमदाराचा अवमान करण्याचा प्रश्न नाही.

ते पुढे म्हणाले, एकाचा विजय झाला आणि एकाचा पराभव झाला. म्हणजे अणुबॉम्ब कोसळला असे होत नाही. अनेक राज्यांमध्ये असे निकाल लागले आहेत. तर महाराष्ट्रात निवडणूक आयोगासोबत रात्रीच्या अंधारात नेते काय करत होते. ही सगळी माहिती आमच्याकडे आहे. कोणाचे मत बाद करायचे यावर आधीच चर्चा झाली होती, असा आरोप राऊतांनी भाजपवर केली आहे. तर, यंत्रणा आमच्याकडेही आहेत फक्त ईडी नाही, असे म्हणत आमच्या हातामध्ये दोन दिवस ईडी दिली तर देवेंद्र फडणवीस सुध्दा शिवसेनेला मतदान करतील, असा दावा त्यांनी केला आहे.

पंकजा मुंडेंना विधान परिषदेचे तिकीट नाकारल्यानंतर शिवसेनेने भाजपवर टीका केली होती. यावर चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांची शिवसेनेने चिंता करू नये, असे म्हंटले होते. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, पंकजा मुंडेंना एकटे पाडण्याचा फडणवीसांचा डाव आहे. पंकजा मुंडे यांची आम्हाला काळजी आहे. कारण त्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. आणि मुंडे व शिवसेनेचे चांगले कौटूंबिक संबंध आहे. त्यानुसार आम्हाला त्यांची चिंता वाटणारच, आम्हाला चिंता करण्याचा पूर्ण अधिकार आहे. महाराष्ट्रात शिवसेने-भाजपची युती टिकवण्यात व वाढण्यात त्यांचे योगदान महत्वपूर्ण होते.

राष्ट्रपती पदाबाबत 15 जून रोजी विरोधी पक्षांची ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत बैठक बोलवली असून त्याचे निमंत्रण आले आहे. परंतु, आम्ही सर्व जण त्यादिवशी अयोध्येत जाणार आहोत. शिवसेनेच्या वतीने इतर मुख्य व्यक्ती बैठकीला जातील, अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : काल एक गद्दार काल बोलला 'जय गुजरात' - उद्धव ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "मराठी शिकणारे शिक्षणमंत्री इंग्रजीमध्ये शिकणारे मुख्यमंत्री..." राज ठाकरेंचा नाव न घेता टोला

Raj Thackeray Live : 'जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलंय'; राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Raj-Uddhav Thackeray Family Member Vijayi Melava : सहकुटुंब सहपरिवार..; ठाकरे बंधूंचे कुटुंब एकाच व्यासपीठावर