राजकारण

सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया...

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Published by : Dhanshree Shintre

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. 2 अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून आले होते. पहाटे 4.55 वाजता ही घटना घडली. दोन अज्ञांताकडून चार राऊंड फायर झाल्याची माहिती प्राथमिक माहिती मिळाली आहे. याच घटनेवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सलमान खान हे सिने जगतातलं मोठं नाव आहे त्यामुळे तुम्ही मला प्रश्न विचारात आहात पण मुंबईसह महाराष्ट्राची कायदा व्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, मुंबई आणि महाराष्ट्राचं संपूर्ण पोलीस खातं हे गद्दार आमदार खासदार आणि शिवसेना राष्ट्रवादीतून पक्ष सोडून गेलेले आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत असे संजय राऊत म्हणाले.

गल्लीतला एखादा माणूस पक्ष सोडून मिंधे गटात किंवा अजित पवार गटात जातोय त्याला चार-चार आणि पाच-पाच बंदूका असणारे माणसं आहेत. म्हटलं हा कोण आहे? नाही तो कालच पक्ष सोडून मिंध्यांकडे गेला आहे नाहीतर अजित पवारांकडे गेला आहे. त्याला चार बंदूकधारी पोलिसांचं संरक्षण आहे. भाजपच्या सर्व चिल्लर कार्यकर्त्यांना सुद्धा पोलीस संरक्षण, एकनाथ शिंदे यांच्या चिल्लर कार्यकर्त्याला प्रचंड पोलीस संरक्षण, अजित पवारांच्या चिल्लर कार्यकर्त्याला पोलीस संरक्षण आणि सामान्य जनता वाऱ्यावर आहे. सलमान खान संदर्भात झालेली फायरिंग हा इशारा नाही तर या बंदुकांच्या गोळ्यांनी भाजप पक्ष आणि त्यांची सरकार यांची पोलखोल केलेली आहे असे संजय राऊतांनी सांगितले आहे.

गृहमंत्री राजकारणात अडकलेत, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत मात्र त्यांचं काम सध्या विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणे, त्यांच्यामागे यंत्रणा लावणं, पोलीस आयुक्त काय करत आहेत, पोलीस आयुक्त तर राजकीय व्यक्ती नाही ना, त्यांचा मुंबईवर लक्ष आहे की नाही, की ते सुद्धा भाजपच्या, गृहमंत्र्यांच्या आणि सरकारच्या पालख्या वाहत आहेत. सलमान खानमुळे तुम्ही मला प्रश्न विचारत आहात पण मुंबईच्या लोकल ट्रेन, मुंबईचे रस्ते, सार्वजनिक ठिकाण सर्वत्र हीच परिस्थिती आहे फक्त बातम्या बाहेर येत नाहीत असे संजय राऊत म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा