थोडक्यात
उद्धव ठाकरे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
संजय राऊत यांची प्रतिक्रिया
(Sanjay Raut) उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत आणि अनिल परब देखील असल्याची होते. गणेशोत्सवादरम्यान ठाकरे बंधूंची भेट झाली होती. त्यानंतर काल पुन्हा उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते.
ही दुसरी भेट असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. शिवतीर्थावर ठाकरे बंधूंमध्ये बैठक झाली असल्याची माहिती मिळत असून पालिका निवडणुकीसंदर्भात तसेच दसऱ्या मेळाव्यासंदर्भात ही बैठक असल्याचे बोलले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, "माननीय उद्धव ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरे यांच्यामधला संवाद हा जबरदस्त आहे. त्याच्यामुळे कधी काय निर्णय घ्यायचे आणि कधी काय घोषणा करायची हे दोघे मिळून ठरवतील. दसऱ्याच्या जो मुहूर्त आहे या हिंदू रितीरिवाजानुसार साडेतील मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे.
"याला राजकारणातील वेगवान घडामोडी म्हणतात. अशा वेगवान घडामोडी घडताना मध्ये कुटुंब असते, नाती असतात. तीसुद्धा सांभाळायची असतात. त्यानुसार आज कौटुंबिक नात्याने माननीय शिवसेना पक्षप्रमुख हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन राज ठाकरे साहेबांच्या आई म्हणजे कुंदा मावशींना भेटले." असे संजय राऊत म्हणाले.