Sanjay Raut  
राजकारण

Sanjay Raut : "शरद पवार - अजित पवार एकत्र आहेतच ना, ते काय आमच्यासारखे..."

शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार का? अशा चर्चा आता पुन्हा सुरु झाल्या आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार का? (Sharad Pawar - Ajit Pawar )अशा चर्चा आता पुन्हा सुरु झाल्या आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा असतानाचा आता राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत चर्चा रंगल्या आहेत. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, "कालच अजित पवार आणि शरद पवार रयत शिक्षण संस्थेच्या बैठकांना एकत्र होते. एकत्रच आहेतच ना ते. ते काय आमच्यासारखे. आम्ही ज्या पद्धतीने ज्यांनी आमचा पक्ष फोडला, ज्यांनी आमचे सरकार पाडलं. ज्यांनी पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करुन महाराष्ट्राच्या पाठित खंजीर खुपसला त्यांच्याशी आम्ही हातमिळवणी करणार नाही ही आमची स्वाभिमानी भूमिका आहे. काय होईल ते होईल."

"माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील जी शिवसेना आहे त्यांची भूमिका पक्की आहे. आमचे काही साखर कारखाने नाहीत, शिक्षण संस्था नाहीत. त्याची आम्हाला चिंता नाही आहेत. आमचे जे काही घ्यायचे आहे ते ईडीने घेऊन टाकलेले आहे. आम्ही भक्कमपणे उभे आहोत. या प्रवृत्तीविषयी लढण्यासाठी. आम्हाला कार्यकर्त्यांना विचारावे लागत नाही काय करायचे. आमचा कार्यकर्ता सांगतो साहेब जायचं नाही. पुढच्या येणाऱ्या 17 तारखेला माननीय शरद पवार आणि माननीय उद्धव साहेब एकत्र आहोत सगळं एका कार्यक्रमात."

" माननीय शरद पवार यांच्याविषयी आमची काहीच तक्रार नाही. हा अजित पवारांचा पक्ष नसून अमित शाहांचा पक्ष आहे, हा एकनाथ शिंदेंचा पक्ष नाही अमित शाहांचा पक्ष आहे. यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम नाही करणार. राजकारण सोडू आम्ही, बाजूला जाऊ, वाट बघू . प्रत्येकाला संधी मिळते. पण अमित शाहांच्या नेतृत्वाखाली सुप्रिया सुळेजी काम करणार का? किंवा पवार साहेब ते नेतृत्व स्विकारणार आहेत का? आम्ही त्यातले नाही. कडी लावा आतली हे आमचे धंदे नाहीत." असे संजय राऊत म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा