राजकारण

Sanjay Shirsat on Priyanka Chaturvedi : आम्ही बोललो तर बात दूर तक जायेगी

शिवसेनेत शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडले. परंतु दोन्ही गट कायम एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करत असतात.

Published by : Siddhi Naringrekar

संजय शिरसाट यांनी माध्यमाशी बोलताना म्हटले होते की, 'प्रियंका चतुर्वेदी खरे तर काँग्रेसच्या प्रवक्त्या होत्या. तेथून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी आमचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी वक्तव्य केले होतं. ते असे म्हणाले होती की, ‘आदित्य ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदींचं सौंदर्य पाहून त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली

यावर उत्तर देत प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, संजय शिरसाट यांचे महिलांबाबतचे विचार यातून दिसून येतात. मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही, ज्याने 50 खोक्यांसाठी आपला आत्मा आणि प्रामाणिकपणा विकला.

यावर प्रतिउत्तर देत संजय शिरसाट म्हणाले की, प्रियंका चतुर्वेदी यांनी चारित्र्यहीनतेच्या गप्पा मारू नये. आम्ही चारित्र्य काढायला लागलो तर बात दूर तक जायेगी. प्रियंका यांच्याबद्दल मी काहीच बोललो नाही. चंद्रकांत खैरे काय बोलले होते हे मी स्पष्ट केलंय. तसेच प्रियंका चतुर्वेदी जिकडे जाल तिकडे भारी असतात. एका तासात फॉर्म भरून राज्यसभेच्या खासदार होतात. चतुर्वेदींऐवजी खासदारकी मुंबईच्या महिला नेत्यांना दिली असती तर चांगले झाले असते. असे शिरसाट म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक