राजकारण

संजयकाका पाटील यांची विशाल पाटील यांच्यावर घणाघाती टीका; म्हणाले...

संजयकाका पाटील यांनी विशाल पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

संजयकाका पाटील यांनी विशाल पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. संजयकाका पाटील म्हणाले की, राजकीय कुरघोडीमधून अपघाताने झालेला हा विशाल पाटील खासदार आहे. त्याच्याबाबतीमध्ये बोलून भांडण लावणं तेवढाच उद्योग हा विशाल पाटील याला जमलेला आहे. रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवेल असं हा विशाल सरडा या जिल्ह्यामध्ये काम करतोय.

तासगावमध्ये पहिल्यांदा अजितरावांच्या कार्यक्रमामध्ये तिथे अजितरावांना पाठिंबा दिला. चार दिवसांनंतर रोहित पाटील यांच्या कार्यक्रमामध्ये गेले तिथे रोहित पाटील यांना पाठिंबा दिला. सगळ्या मतदारसंघामध्ये भांडणं लावणं आणि अतिशय अपरिपक्व असा खासदार आपल्याला दिसतो आहे.

गेल्या चार महिन्यात अनेक ठिकाणी त्यांच्या भूमिका बदलल्या. काही ठिकाणी जातात आणि वेगवेगळ्या नेत्यांना तुम्ही विधानसभेला तयार राहा अशा कुरघोडीच्या भूमिका आपल्याला पाहायला मिळतात. विश्वजीत कदम यांना नेता म्हणायचे आणि त्यांना गुप्त कारस्थान करुन अडचणीत आणायचं हा उद्योग आपण पाहतो आहे. संसदेमध्ये बोलबच्चनगिरी करणं आणि तेच व्हिडिओ लोकांच्यामध्ये फिरवणं याच्याने काम होत नाही.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, माझं विशाल पाटील यांना जाहीर आव्हान आहे की, तुमच्या घरामध्ये 35 - 40 वर्ष सत्ता होती आणि माझी दहा वर्ष मला जनतेनं दिलेली. एका स्टेजवर या आणि या जिल्ह्यातील जनतेला, राज्यातील जनतेला कुणाच्या काळामध्ये किती पैसे आले आणि काय काय विकास झाला हे एकदा जनतेला सांगूया. यापुढे जर तुमची बेताल वक्तव्य थांबली नाहीत, तर मी तुम्हाला इशारा देतो आहे त्याचे राजकीय आणि सगळे परिणाम तुम्हाला भोगावं लागतील. असे संजय काका पाटील म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा