शंभूराज देसाई यांच्याकडे मंत्रीपदाची शपथ गेतल्यानंतर पर्यटन, खाणकाम, माजी सैनिक कल्याण हे तीन खाते आले. हे तिन्ही खाते त्यांच्यासाठी नवीन आहेत. अशातच भाजप पक्ष पालकमंत्री पदासाठी साताऱ्यात रेसमध्ये असताना शिवसेनेचे शंभूराजे देसाईंनाच पालकमंत्री पद मिळालं आहे. सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा पालकमंत्री पदाला शंभूराजे देसाई यांची निवड झाल्यानंतर साताऱ्यामध्ये पालकमंत्री यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली होती.
पालकमंत्री शंभूराज देसाई साताऱ्यामध्ये दाखल होण्यातत्पूर्वी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत आणि जल्लोषाची तयारी केली होती. दुसऱ्यांदा साताऱ्याचे पालकमंत्री झालेले शंभूराजे देसाई यांचे साताऱ्याच्या शाहू नगरीमध्ये जल्लोषात स्वागत शिवसेनेकांनी 'आला रे आला शिवसेनेचा वाघ' आला अशी घोषणा देत केले आहे. तसेच फटाक्यांच्या आदेशबाजीसह आणि डीजेच्या दणक्यात शंभूराजे देसाई यांचे आगमन सातारा जिल्ह्यात झाले आहे.
दुसऱ्यांदा पालकमंत्री पद मिळाले म्हणून शंभूराजे देसाई यांनी सातारकरांचे आभार देखील व्यक्त केले आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व अजित पवार यांच्या सहकार्याने सातारा दुसऱ्यांदा मला पालकमंत्री पदाची संधी मिळाली आहे, असं म्हणत त्यांनी या तिघांचे देखील आभार मानले आहेत.
साताऱ्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया साताऱ्याचे नूतन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली आहे. यावेळी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांचे सातारी स्पेशल कंदीपेढ्याने तुलना करण्यात आली आली आहे. पर्यटन मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांचे साताऱ्यात जल्लोषात स्वागत केले जात आहे.