राजकारण

काँग्रेसचे जेष्ठ नेते माणिकराव गावित यांचे निधन

राजकीय वर्तुळावर पसरली शोककळा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नाशिक : काँग्रेसचे जेष्ठ नेते माणिकराव गावित यांचे आज निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. नाशिकच्या सुयश हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. यामुळे राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली असून त्यांना श्रध्दांजली वाहण्यात येत आहे.

माणिकराव गावित मागील काही दिवसांपासून लंग इन्फेक्शनने त्रस्त होते. त्यांच्यावर नाशिकच्या सुयश हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. आज अखेर सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

माणिकराव गावित यांचा राजकीय प्रवास

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे सलग 9 वेळा निवडून येण्याचा विक्रम करणारे 88 वर्षीय माणिकराव गावित यांच्या नावावर आहे. 1965 मध्ये ग्रामपंचायतीपासून राजकारणाचा श्रीगणेशा करणार्‍या माणिकराव गावितांना केंद्रीय गृह राज्यमंत्री, सामाजिक न्याय राज्यमंत्री ही पदे न मागताच मिळाली. संसदेतील सर्वात ज्येष्ठ खासदार म्हणून त्यांनी लोकसभेचे हंगामी अध्यक्षपदही भूषवले आहे. 1981 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा लढवली व विजयी झाले. त्यानंतर ते 1980 ते 2014 पर्यंत म्हणजे 34 वर्षे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून सातत्याने विजयी झाले आहेत. परंतु, 2014 मध्ये त्यांना पहिल्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले.

पान खाणारे खासदार, गाडीला हात दिला, तर गाडी थांबवणारे खासदार व दांडगा जनसंपर्क असणारा नेता म्हणूनही त्यांची ख्याती आहे. सुमारे पाच दशकांची संसदेतील कारकीर्द असूनही माणिकरावांवर गैरप्रकाराचा कुठलाही आरोप झालेला नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pappu Yadav Challenges Raj Thackeray : "ही गुंडगिरी थांबवली नाही तर..."; पप्पू यादवची राज ठाकरेंना धमकी

Latest Marathi News Update live : त्रिभाषा सूत्र विरोधात शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती आक्रमक

Baby Trafficking Pune : पुण्यात गुन्हेगारीचा सापळा; 40 दिवसांच्या बालकाची विक्री, 6 आरोपी अटकेत

Dhurandhar Movie Teaser Out : रणवीर सिंगचा रावडी लूक; 'धुरंधर'च्या टीझरनं वाढवली चाहत्यांची उत्सुकता