chala hawa yeu dya Team Lokshahi
राजकारण

शहाजीबापू पाटलांनी बायकोसाठी घेतला 'दुष्काळी' उखाणा

निलेश साबळे आणि उपस्थितांच्या आग्रहास्तव शहाजीबापूंनी पत्नीसाठी उखाणाही घेतला.

Published by : Shubham Tate

Shahajibapu Patil : 'चला हवा येऊ द्या' हा मनोरंजनाचा कार्यक्रम देशभरात सगळ्यांच्याच मनावर राज्य करतो. या कार्यक्रमात नेहमी कोणी ना कोणी हजेरी लावत असतचं. अशातच ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, सगळं ओक्केमध्ये’ या जबरदस्त डायलॉगने संपूर्ण महाराष्ट्रालाच खळकळून हसवणारे शहाजी बापू पाटील यांनी पत्नी रेखाताई पाटीलसह या कार्यक्रमात हजेरी लावली आहे.

यावेळी कार्यक्रमात त्यांनी पत्नीसाठी खास दुष्काळी उखाणा घेतला आहे. यावेळी, निलेश साबळे आणि उपस्थितांच्या आग्रहास्तव शहाजीबापूंनी पत्नीसाठी उखाणाही घेतला. तसेच 'चला हवा येऊ द्या'च्या याच भागात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील याही त्यांच्या जोडीदारासमवेत दिसून आल्या.(Shahajibapu Patal took the nickname 'Dushkali' for his wife)

खास दुष्काळी उखाणा

माझ्या दुष्काळी तालुक्याला पाणी पुरवणाऱ्या नदीचं नाव आहे माण, रेखा माझी जान... असा दुष्काळी भागाची व्यथा मांडणार उखाणा शहाजीबापूंनी घेतला. दरम्यान या उखाण्याच सगळ्यांनीच कौतुक केल.या कार्यक्रमात भाऊ कदमने त्यांचा "काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटील... एकदम ओक्के" असा डायलॉग मारला. तर, शहाजीबापूंनीही काय चला हवा येऊ द्या, काय भाऊ कदम, काय डॉक्टरसाहेब... असे म्हणत पुन्हा एकदा गुवाहाटीची आठवण करुन दिली.

रेखाताईंनी घेतलेला उखाणा

गुवाहाटीवरून परत आल्यानंतर म्हमजेच 15 दिवसांनी शहाजी बापू पाटील यांनी मतदारसंघात पाय ठेवले.यावेळी त्यांच जल्लोषात स्वागत करण्यात आलं. तसेच यावेळी रेखाताई पाटील यांनी "आशील तिथं मुलीने नम्रतेने वागावे, शहाजी बापूंसारखा पती मिळाल्यावर देवाकडे आणखी काय मागावे..." असा उखाणाही घेतला होता. तसेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याचा मला आनंद आहे, आता सगळं ओक्के वाटतंय. आता मलाही घेऊन ते गुवाहाटीला जाणारंय की, असेही रेखा यांनी शहाजीबापूंच्या स्वागतावेळी म्हटले होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा