(Sharad Pawar - Ajit Pawar ) गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशी चर्चा महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सुरू असतानाच या चर्चांवर शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
शरद पवार यांनी भूमिका मांडल्यानंतर आज पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. आजच्या समारोपाच्या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार आहेत.
शरद पवार, अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार असे पवार कुटुंबातील व्यक्ती एकत्र येणार असल्याची माहिती मिळत आहे.