बदलापूरमधील एका शाळेमध्ये दोन शाळकरी मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरली आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या महाराष्ट्र बंदला अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. 24 ऑगस्ट 2024 रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता.
उद्याच्या बंद मधून महिला आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचार विरोधात सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होता. बंद भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकाऱ्यांच्या कक्षेत होता. पण मुंबई उच्च न्यायालयाने घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. त्यामुळे संविधानाचा आदर करुन उद्याचा बंद मागे घ्यावा. शरद पवारांचं महाविकास आघाडीला आवाहन आहे.