थोडक्यात
भाजप सोडून इतरांशी युतीसाठी पवारांची राष्ट्रवादी तयार
शरद पवार यांची एकनाथ शिंदे आणि अजित दादांना खुली ऑफर
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
(Sharad Pawar) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मोठा निर्णय घेतला असून स्थानिक पातळीवर भाजपसोबत कोणत्याही प्रकारची युती करू नका असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्या सोबतही स्थानिक पातळीवर युतीचे संकेत शरद पवार यांनी दिले असल्याची माहिती मिळत आहे.
राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या 2 डिसेंबरला यासाठी मतदान होणार असून 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. 'स्थानिक परिस्थिती पाहून युतीबाबत निर्णय घ्या'फक्त भाजपसोबत युती करू नका असे शरद पवारांनी सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या असल्याची माहिती मिळत आहे.
भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत युती करा, असे आदेशच वरिष्ठांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती मिळत आहे. आता भाजप सोडून इतरांशी युतीसाठी पवारांची राष्ट्रवादी तयार असल्याचे पाहायला मिळत असून यावरुन शरद पवार यांची एकनाथ शिंदेंना खुली ऑफर देण्यात आल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विरोधी पक्षांचं समीकरण बदलण्याची सुरुवात या निर्णयानंतर होऊ शकते. शरद पवार यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, स्थानिक परिस्थितीचा आढावा घ्या आणि त्यानुसार युतीबाबत निर्णय घ्या.