राजकारण

Sharad Pawar आज जालना दौऱ्यावर, जखमी आंदोलकांची घेणार भेट

जालना जिल्ह्यातील अंतरवाली जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुण आंदोलन करत होते.

Published by : Team Lokshahi

जालना जिल्ह्यातील अंतरवाली जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुण आंदोलन करत होते. या मराठा आक्रोश मोर्चाचा उपोषणाचा चौथा दिवस आहे. पोलिसांनी तीव्र लाठीचार्ज केला. यामुळं आंदोलकांनी आक्रमक होऊन पोलिसांवर दगडफेक सुरु केला. यामध्ये काही आंदोलक जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत.

 या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी  गावाला भेट देणार आहेत.  यावेळी ते आंदोलनादरम्यान जे आंदोलक जखमी झाले आहेत, त्यांची विचारपूरस करणार आहेत. शरद पवार साडेबारा वाजता अंबड रुग्णालयाला भेट देतील. 

उपोषण आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्या बाचाबाची झाली. जालन्यात मराठा उपोषण आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जनंतर आता राज्यभरातून त्यावर प्रतिक्रिया येत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Resham Tipnis : लेकाचा फोटो वापरल्याने एकच गोंधळ, अभिनेत्री संतापली म्हणाली की, 'ज्याने हे वाईट...'

NEET-UG 2025 : निकालांविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर