राजकारण

तीन राज्यात भाजप आघाडीवर; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

भाजपने मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड राज्यात आघाडी घेतली आहे. तर, तेलंगणा राज्यात कॉंग्रेस आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. सुरुवातीच्या कलांनुसार भाजपने मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड राज्यात आघाडी घेतली आहे. तर, तेलंगणा राज्यात कॉंग्रेस आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार म्हणाले की, याच्या पेक्षा वेगळा निकाल लागेल अशी आमची माहिती नव्हती. राजस्थानमध्ये कॉंग्रेस सत्तेत होती पुन्हा नवीन लोकांना संधी दिली. ४ राज्यातील निकालानंतर मंगळवारी इंडिया अलायंन्सची बैठक बोलावली आहे त्यात चर्चा होईल. यात निकाल लागलेल्या राज्यातील जाणकारांच मत सुद्धा घेणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

आम्हा सगळ्यांची मागणी संपूर्ण देशात जातनिहाय जनगनना झाली पाहिजे त्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली यात मराठा समाजाला आरक्षणाची भूमिका घेतली याबाबत केंद्र सरकारनं भूमिका घेतली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, एका बाजूनं आरक्षणाची मागणी करतोय. मात्र दुसऱ्या वर्गाला आरक्षणाला धक्का लागायची भीती आहे. मात्र त्यांच्या हिताला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण मिळावं, असे शरद पवारांनी म्हंटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा