जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. याचे पडसाद राज्यभरात उमटत असून राज्याचे राजकारणही चांगलेच तापले आहे. याठिकाणी राजकीय नेत्यांनी भेट दिली आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले की, ओबीसी आणि इतर लोकांमध्ये मतभेद नको. आज जी 50 टक्क्यांची अट आहे, यात आणखी 15 ते 16 टक्क्यांची वाढ करण्यासंदर्भातील दुरुस्ती पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारने करून घेतली, तर हे प्रश्न सुटतील. तसेच ओबीसी कोट्यातून आरक्षण देणं अन्यायकारक ठरेल. असे शरद पवार म्हणाले.