राजकारण

संजय राऊतांच्या 'त्या' दाव्यावर शरद पवारांनी सुनावले; म्हणाले...

आगामी लोकसभेच्या निवडणुकाची तयारी सर्वपक्षीयांकडून सुरु झाले आहेत. परंतु, या निवडणुकीत महाविकास आघाडीत जागावाटपावरुन दावे-प्रतिदावे सुरु आहेत

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : आगामी लोकसभेच्या निवडणुकाची तयारी सर्वपक्षीयांकडून सुरु झाले आहेत. परंतु, या निवडणुकीत महाविकास आघाडीत जागावाटपावरुन दावे-प्रतिदावे सुरु आहेत. अशात, मेरीटवरुन जागा वाटप केले जाणार असल्याचे मविआतील वरिष्ठ नेत्यांनी सांगितले आहे. तरीही संजय राऊतांनी 18 जागांवर दावा केला आहे. यावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहेत. उद्धव ठाकरे यांनी राऊत यांना वेगळी पॉवर दिली नाही, असे म्हणत शरद पवारांनी म्हंटले आहे.

जागा वाटपाबातत आमचे ठरले आहे. सर्व नेते बसून आम्ही ठरवू. उद्धव ठाकरे यांनी राऊत यांना वेगळी पॉवर दिली नाही, असे शरद पवार म्हणाले आहे. तर, संजय राऊत यांच्या थुंकण्याच्या कृतीबाबत शरद पवारांनी विचारले असता ते म्हणाले, या विषयावर बोलणार नाही, इतर अनेक महत्वाचे प्रश्न आहेत, तो महत्वाचा प्रश्न नाही.

२०१४ मध्ये सुप्रिया सुळे या कमी मताने निवडून आल्या होत्या. आमचा समन्वय असणे गरजेचे आहे. आमचे त्या ठिकाणी दोन आमदार आहेत. सासवड, भोर यापूर्वी इंदापूर या ठिकाणी सुद्धा होता. मेरिटनुसार आम्ही निर्णय घेणार आहोत. अजित पवार यांनी सुद्धा अशी भूमिका मांडली आहे. आम्हाला भाजपाला येथून हटवायचे आहे. त्यामुळे आमचा हा प्रयत्न आहे.

लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता फेबुवारीमध्ये येईल. मोदी सरकारचे आता काऊंट डाऊन सुरु झालं आहे, असा निशाणा शरद पवार यांनी साधला आहे. आज केंद्र सरकारची तिजोरी खाली आहे. हे सरकार कर्ज घेऊन देश चालवत आहे. मग, सामान्य लोकांचे पैसे गेले कुठे, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

दरम्यान, बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेन रुळावरून घसरल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत 233 लोकांचा मृत्यू तर 900 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रेल्वे अपघात गंभीर आहे. नेहरूंच्या काळात अपघात झाल्यानंतर लालबहादुर शास्त्री यांनी नैतिकता बाळगत राजीनामा दिला होता, आजच्या राजकारण्यांनी त्यांना हवे तसे करावे, असे त्यांनी म्हंटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा