Uddhav Thackeray | Sharad Pawar | Prakash Ambedkar  Team Lokshahi
राजकारण

पवार, आंबेडकरांच्या 'त्या' विधानावरून भाजपचा ठाकरेंना टोमणा; म्हणाले, न घरका ना घाटका...

आज शरद पवार म्हणतायत तपास यंत्रणांद्वारे विरोधकांना त्रास दिला जातोय आणि प्रकाश आंबेडकर म्हणतायत मोदी तपास यंत्रणांचा गैरवापर करत नाहीत. आंबेडकरांचे विधान.

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड गोंधळ सुरु आहे. त्यातच नुकताच शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाली. या युतीमुळे राजकीय वर्तुळात एकच गदारोळ सुरु आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी आणि वंचित यांच्या युतीबाबत देखील सध्या संभ्रम आहे. त्यातच आता राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर केली आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारच्या समर्थनात विधान केले होती. त्यावरूनच आता भाजपने या दोन्ही नेत्यांच्या व्यक्तव्यावरून उद्धव ठाकरेंना सवाल केला आहे.

काय केला भाजपने सवाल?

शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर या दोन्ही नेत्यांच्या विधानावर बोलताना भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय म्हणाले की, आज शरद पवार म्हणतायत तपास यंत्रणांद्वारे विरोधकांना त्रास दिला जातोय आणि प्रकाश आंबेडकर म्हणतायत मोदी तपास यंत्रणांचा गैरवापर करत नाहीत. या विरोधाभासी वक्तव्यांमध्ये उद्धव ठाकरे कोणाची बाजू घेणार?#न_घरका_ना_घाटका अशी परिस्थिती होणार. असा टोमणा यावेळी त्यांनी ट्विटरवरून ठाकरेंना लगावला आहे.

काय म्हणाले होते पवार आणि आंबेडकर?

पंतप्रधान नरेंद्र मोदी अंमलबजावणी संचनालय ( ईडी ), केंद्रीय अन्वेषण विभाग ( सीबीआय ) आणि आयकर विभाग ( आयटी ) यांचा गैरवापर करत आहेत, असं वाटत नाही. त्यांच्या जागी मी असतो, तरी तेच केलं असतं. कोणाही सत्ता राखण्यासाठी जे करतो, तेच नरेंद्र मोदी करत आहेत. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. याच विधानावर शरद पवारांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले होते की, अलीकडे आम्ही पाहतोय की, तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यात येतोय. ते शरद पवार म्हणाले होते. या दोन्ही विधानावरून भाजपने आता उद्धव ठाकरेंना सवाल केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा