राजकारण

शरद पवार बोलले की उद्धव ठाकरेंना बोलावंच लागतं; फडणवीसांचा निशाणा

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून शिदें-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानांवरुन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून शिदें-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार बोलले की उद्धव ठाकरेंना बोलावंच लागतं, अशी टीका त्यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज उभ्या महाराष्ट्राचे दैवत आहेत. छत्रपती उदयन राजे यांनी पत्र लिहिल्यानंतर शरद पवार यांच्या लक्षात आले. आज पवार आधी बोलले त्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार बोलले की उद्धव ठाकरेंना बोलावंच लागतं. उद्धव ठाकरे काय बोलले यावर मी बोलणार नाही कारण मी ऐकलं नाही, असे त्यांनी म्हंटले आहे. तसेच, वेगवेगळी सरकार आहेत. आजवर राज्यात पक्षाचा वाद सीमा वादात आणला नाही. आताही कोणी वाद आणू नये, असेही आवाहन फडणवीसांनी विरोधकांना केले आहे.

तर, कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी देवेंद्र फडणवीस चिथावणीखोर वक्तव्य करत असल्याचा आरोप केला होता. यावरही देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, हा प्रश्न जेव्हापासून राज्य निर्मिती झाली तेव्हापासून आहे. आपल्या देशात संविधान आहे. आपली मागणी घेऊन आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आहे. सर्वोच्च न्यायालयापेक्षा कुणीही मोठे नाही. मी कोणतेही चिथावणी खोर वक्तव्य केलेलं नाही. मी भूमिका मांडली आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

दरम्यान, उध्दव ठाकरेंनी बोम्मई जे काय बोलले हे वरिष्ठांच्या मर्जीशिवाय बोलले का? म्हणजेच भाजपचा महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालण्याचा हा प्रयत्न सुरु आहे, अशी टीका केली. तर, राज्यातही भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. यामुळे बोम्मई यांचा आत्मविश्वास वाढला आहे. कसेही वागा काहीही मागणी करा. त्याला ते जबाबदार आहेत तसेच या देशात सत्तेत बसलेले देखील आहेत, अशी निशाणा शरद पवारांनी मोदी सरकारवरही साधला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा