राजकारण

शरद पवारांचा कार्यक्रम उधळण्याचा रचला कट; टोपेंना दिली आत्महत्येची धमकी

राजेश टोपे व अंबडमधील एकाची ऑडिओ क्लीप व्हायरल

Published by : Shweta Shigvan-Kavankar

रवी जयस्वाल | जालना : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा उधळून लावण्याच कट रचला होता अशी एका व्यक्तीची आणि राष्ट्रवादी नेते व माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे याची ऑडीओ क्लीप व्हायरल झाली आहे. एवढेच नव्हेतर मी राजेश टोपे असे नाव लिहून आत्महत्या करेन, अशी धमकीही त्यां व्यक्तीने दिली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जालना जिल्ह्यातील गोंदी येथील प्रल्हाद मरकड यांनी राजेश टोपे यांना फोन केला. आणि गोंदी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ हा बलात्कारी माणूस आहे. गावात त्याचे एका कर्मचाऱ्याच्या पत्नीसोबत उघड अफेअर सुरु आहे, अशी तक्रार प्रल्हादनं टोपे यांच्याकडे केली. त्याचबरोबर मीच शरद पवार यांची सभा उधळून लावण्याचा कट रचला होता, असंही त्या व्यक्तीनं म्हंटलं आहे.

यासोबत माझं कर्ज माफ झालं नाही तर मी राजेश टोपे असे नाव लिहून आत्महत्या करेन, अशी धमकीही टोपे यांना प्रल्हाद मरकडने दिली आहे. या सगळ्या प्रकारामुळं जिल्ह्यात खळबळ उडाली असून चर्चा सुरु झाल्या आहेत.

तर, पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्यावर तातडीने अॅक्शन घेत तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. दरम्यान, राजेश टोपे यांनी ही माहिती पोलिसांना कळविली असून यासंदर्भात पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा