राजकारण

Shasan Aplya Dari : बीडच्या परळीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम; पंकजा मुंडे उपस्थित राहणार का?

आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन बीडच्या परळीमध्ये करण्यात आले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन बीडच्या परळीमध्ये करण्यात आले आहे. परळीतील शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने हे सर्व नेतेमंडळी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतील. यासोबतच सुमारे दीड हजार कोटींच्या कामांचा शुभारंभ होणार असून, अनेक पूर्ण कामांचे होणार लोकार्पण देखील होणार आहे.

याच पार्श्वभूमीवर आज सरकारच्या या कार्यक्रमाला भाजपा नेत्या पंकजा मुंडे उपस्थित राहणार का याकडे लक्ष असणार आहे. परळीतील वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 286 कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची सुरुवात परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या भूमिपूजन करून अनेक विकास कामांचे भूमिपूजन या ठिकाणी होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Disha Salian Case: 'उंची पेंग्विनसारखी, चाल बदकासारखी...'; ठाकरे गटाचा पुन्हा हल्लाबोल म्हणाले...

SEBI Highest Penalty : SEBI नं जेन स्ट्रीट ग्रुपला 4,843 कोटी रुपयांचा दंड ठोठावला

Latest Marathi News Update live : विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

Car Accident CCTV Footage : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं 4-5 जणांना उडवलं