(Shashikant Shinde) शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईत एक बैठक पार पडली. या बैठकीत शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
या बैठकीला शरद पवार, जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे यांच्यासह इतरही अनेक महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती होती. नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अनिल देशमुख यांनी शशिकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला.
जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कोणावर देण्यात येणार याकडे लक्ष लागले होते. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शशिकांत शिंदे म्हणाले की, 'मी माझ्या पक्षाच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. मला जी संधी मिळाली त्या संधीचे सोनं करायचा प्रयत्न मी 100 टक्के करेन.'