Admin
राजकारण

Maharashtra Government : शिंदे सरकारला एक महिना पूर्ण, मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप रखडला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्रातील 'शिंदे'गट-भाजप आघाडी सरकारला जवळपास एक महिना पूर्ण झालेला आहे. पण अद्याप या सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त सापडला नाही.

Published by : Team Lokshahi

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्रातील 'शिंदे'गट-भाजप आघाडी सरकारला जवळपास एक महिना पूर्ण झालेला आहे. पण अद्याप या सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त सापडला नाही. या प्रकरणी विरोधकांची चौफेर टीका सुरू असताना शिंदेंनी गुरूवारी येत्या 3 दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याचे सूतोवाच केले आहे.

मंत्रिमंडळ विस्तार किती टप्प्यात होणार?

महाराष्ट्रातील भाजप व शिंदे गटाच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार किती टप्प्यंत होईल यावर मुख्यमंत्री व उप-मुख्यमंत्री यांच्यात लवकरच चर्चा होणार आहे. शिंदे गटात 40 बंडखोर आमदार आहेत. त्यामुळे 26 आमदारांना एकत्र ठेवणे सोपी गोष्ट नाही. त्यामुळे ज्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही त्यांची विविध महामंडळांवर वर्णी लावण्याचा प्रयत्न केला जाईल.

महत्वाचे निर्णय बदलले -

शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर आधीच्या सरकारचे अनेक निर्णय बदलण्यात आले. तसेच अनेक नवीन निर्णय घेण्यात आले. यामध्ये प्रमुख्याने आरे कारशेडचा निर्णय होता. त्यानंतर औरंगाबाद-उस्मानाबाद नामांतर हे निर्णय होते. यावरुन राज्यात वादंग झाला. आरे बाबात अद्यापही आंदोलन सुरु आहे. हे प्रकरणही कोर्टात गेलेय.

शिंदे सरकारचे महत्वाचे निर्णय

मुंबई मेट्रो-3च्या कारशेडचा निर्णय

मेट्रोच्या इतर कामांनाही परवानगी

बुलेट ट्रेनच्या कामाला हिरवा कंदील

एमएमआरडीएच्या योजनांना 12 हजार कोटीचं कर्ज

ओबीसी आरक्षणाचा निकाल

औरंगाबाद, उस्मानाबादचं नामांतर

पेट्रोल-डिझेलमध्ये दरकपात

फोन टॅपिंग केस सीबीआयकडे सोपवली

सगळे सणवार निर्बंधमुक्त करण्याचा निर्णय

गणेशमूर्तींच्या उंचीवरचे निर्बंध हटवले

गतिशक्ती, हर घर जल सारख्या योजना

जलसिंचन योजनेच्या शेतकऱ्यांना वीजदरात सवलत

लोणार सरोवर विकास आराखड्यास मान्यता

शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान

जळगाव, ठाण्यातील जलसंपदा प्रकल्पाला मान्यता

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी