राजकारण

शिंदे सरकारचे मंत्री संजय राठोड यांना कोरोनाची लागण

संजय राठोड यांनी ट्वीट करून दिली माहिती

Published by : Shweta Shigvan-Kavankar

संजय राठोड | यवतमाळ : अन्न औषध व प्रशासन मंत्री संजय राठोड यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियावर ट्विट करून त्यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, पोळ्याच्या सणानिमित्त त्यांनी शनिवारीच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

संजय राठोड यांना कोरोनाची लागण झाली आहे. सेंट जॉर्ज हॉस्पिटल मुंबई येथे कोरोना चाचणी केली व ती पॉझिटीव्ह आली. लक्षणे नसल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना घरीच क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे. संपर्कात आलेल्यांना काही त्रास किंवा लक्षणे असेल तर त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन मंत्री राठोड यांनी केले आहे.

पोळ्याच्या सणाला यवतमाळ येथील समता मैदानावर आयोजित कार्यक्रमात संजय राठोड हजेरी लावून शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. यामुळे आता टेन्शन वाढले आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यानंतर सुरुवातीपासूनच संजय राठोड हे एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. बंजारा समाजात संजय राठोड यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये संजय राठोड यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली. परंतु, त्यांचे मंत्रिपद वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे, पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात चहुबाजूंनी संजय राठोड यांच्यावर आरोप झाले होते. त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला. परंतु, सत्तातरानंतर त्यांना क्लिनचिट मिळाली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Monorail : मुंबईची मोनोरेल काही काळ राहणार बंद; तांत्रिक बिघाडावर तोडगा काढण्यासाठी निर्णय

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आईसोबतच्या आठवणींना उजाळा दिला,म्हणाले...

PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस; डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन करुन दिल्या शुभेच्छा

Latest Marathi News Update live : आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन