राजकारण

दसरा मेळावा शिंदे गट हायजॅक करणार? केसरकरांनी सांगितली अधिकृत भूमिका, म्हणाले..

शिंदे गटाकडून शिवसेनेचा 'दसरा मेळावा' हायजॅक करणार असल्याच्या चर्चा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तानाट्यानंतर शिंदे गटाकडून शिवसेनेचा 'दसरा मेळावा' हायजॅक करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. यावरुन राजकीय नवातावरण चांगलेच तापले होते. अखेर आज शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी अधिकृत भूमिका मांडली आहे. मेळावा घ्यायचा की नाही याबाबत अजून तरी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला नाही, अशी प्रतिक्रिया केसरकरांनी दिली आहे.

दीपक केसरकर म्हणाले की, हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन एकनाथ शिंदे यांनी हे सरकार स्थापन केले आहे. बाळासाहेबांच्या विचारपासून कधीच फारकत नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी हा दसरा मेळावा सुरु केला आहे. हा दसरा मेळावा घ्यायचा की नाही याबाबत अजून तरी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला नाही. ठाकरे गटाने परवानगी मागावी. मात्र, या संदर्भात काही परवानगी पाहिजे असेल तर ते देतील. या सर्व प्रकरणामध्ये मुख्यमंत्री योग्य निर्णय देतील, असे त्यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांचा वाद आता घटनापीठाकडे गेला आहे. हे आता अजून 4-5 वर्ष चालेल. यादरम्यान दुसरी निवडणुक जिंकून पुन्हा सत्तेत येऊ, असे विधान भरत गोगावले यांनी केले होते. यावरुन विरोधकांनी भरत गोगावले यांच्यावर टीकास्त्र डागले होते. याबाबत बोलताना केसरकर म्हणाले, काल एका जाहीर सभेमध्ये आमचे नेते भरत गोगावले यांनी सुप्रीम कोर्टाबद्दल विधान केले. मात्र, यामध्ये मुख्यमंत्री यांचा संबंध नाही. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कोणतेही मत व्यक्त करणे योग्य नाही. यानंतर कोणी यासंदर्भात बोलणार नाही याची काळजी घेतली जाणार जाईल, असे स्पष्टीकरण दीपक केसरकर यांनी दिले आहे.

दरम्यान, शिंदे गटाकडून पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ता बदलण्यात आला आहे. दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरातील शिवसेना भवना ऐवजी ठाण्यातील आनंद आश्रम हा पत्ता देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे गटाचे ऑफीस हे मुंबईमध्येच असणार आहेत, असे सांगितले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Raut : मुंबईत आज साजरा होणार ‘मराठी विजय दिन’; संजय राऊतांनी सांगितली कार्यक्रमाची रुपरेषा

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांचीही हजेरी

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून