मुंबई: पेणचे माजी नगराध्यक्ष शिशीर धारकर यांनी आज मातोश्री या निवासस्थानी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाला टोला लगावला आहे. वॉशिंगमशीनमध्ये तुम्ही जाऊ शकला असतात मात्र, लढवय्यांच्या शिवसेनेत तुम्ही आला आहात. अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिशीर धारकर आणि त्यांच्या सहकार्यांचं स्वागत केले आहे.