भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नाना पटोले यांच्या उपस्थितीत शिशुपाल पटले यांनी पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्यावेळी शिशुपाल पटले यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी शिशुपाल पटले म्हणाले की, देशामध्ये सत्तेचा धाक दाखवून, ईडीच्या कारवाया करुन पक्ष तोडण्याचा हा घिनोना प्रकार हा आम्हा कार्यकर्त्यांना योग्य वाटला नाही. अनेक विकासाची काम बंद पाडून वोट बँकसाठी योजना आणणं आणि धोरण आणणं.
या सर्व गोष्टी आता आम्हाला काही योग्य वाटलं नाही. त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाचा एक महिनाआधी राजीनामा दिला होता. नाना भाऊ पटोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश केलेला आहे.