Uday Samant  team lokshahi
राजकारण

Uday Samant : शिवसैनिकांनी फोडली उदय सामंतांची गाडी

तानाजी सावंतांच्या घराकडे जाताना शिवसैनिकांकडून हल्ला

Published by : Team Lokshahi

Uday Samant : बंडखोर आमदार आणि आक्रमक शिवसैनिक यांच्यातला संघर्ष हा सध्या शिगेला पोहोचताना दिसत आहे. कारण आज पुण्यात आक्रमक शिवसैनिकांनी एक धक्कादायक प्रकार केला आहे. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी आक्रमक हल्ला केला आहे. यामध्ये उदय सामंतांची गाडी ही शिवसैनिकांकडून फोडण्यात आली आहे. (Shiv Sainiks broke Uday Samant's car)

दरम्यान, शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि बंडखोर नेते उदय सामंत काही क्षण एकमेकांसमोर आले. उदय सामंत हडपसरकडून कात्रज कोंढवा रोडने कात्रज चौकात आले. त्याच वेळी आदित्य ठाकरेंचा ताफा त्याच चौकाकडे येत होता. त्यामुळे शिवसैनिकांची प्रचंड मोठी गर्दी चौकात झाली होती. यातील काही शिवसैनिकांनी उदय सामंतांची गाडी ओळखली व गाडीला घेराव घातला. गद्दार गद्दार अशा घोषणा देत उदय सामंत त्यांच्या गाडीला घेराव घातल्याने पोलिसांनी गाडीला सुरक्षा देण्याचा प्रयत्न केला. मात्र आक्रमक शिवसैनिकांनी गाडीवर हल्ला केला.

पुण्यात सामंत यांच्या गाडीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटली आहे. आमदार तानाजी सावंत यांच्या घरी जात असताना हा हल्ला झाला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Raut : मुंबईत आज साजरा होणार ‘मराठी विजय दिन’; संजय राऊतांनी सांगितली कार्यक्रमाची रुपरेषा

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांचीही हजेरी

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून