Uddhav Thackeray | Draupadi Murmu Team Lokshahi
राजकारण

...त्यामुळे शिवसेनेचा द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर; उद्धव ठाकरे

काही बातम्या विचित्रं पद्धतीने पसरल्या; उद्धव ठाकरे

Published by : Shubham Tate

Presidential Election 2022 : महाराष्ट्रातील सत्ता गमावलेल्या उद्धव ठाकरेंसमोर आता आणखी एक अडचण निर्माण झाली आहे. यावेळी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा दिल्याने महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांसमोर धार्मिक संकट निर्माण झाले आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवरून शिवसेनेच्या खासदारांमध्ये गदारोळ सुरू आहे. बहुतांश खासदार एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या समर्थनात आहेत, मात्र राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांची बाजू घेत आहेत. (Shiv Sena announces support to Draupadi Murmu Uddhav Thackeray)

यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काही बातम्या विचित्रं पद्धतीने पसरल्या आहेत. काल खासदारांची बैठक झाली. त्यात कोणीही माझ्यावर दबाव आणला नाही. राष्ट्रपतीपदी कुणाला पाठिंबा द्यायचा हे तुम्ही ठरवा. कुणाला द्यायचा कुणाला नाही हे तुम्ही सांगाल तसं. कारण हा विषय तुमचा आहे. आजही मी भूमिका स्पष्ट करत आहे. अशी माहिती यावेळी ठाकरे यांनी दिली.

दरम्यान, पुढे बोलताना ते म्हणाले की, मातोश्रीवर गर्दी आहे. इथेही गर्दी आहे. मी पराभूत झालेल्या काही उमेदवारांशी चर्चा केली आहे. जिल्हाप्रमुखांशी चर्चा सुरू आहे. खासदारांशी चर्चा सुरू आहे. शिवसेनेतील आदिवासी समाजात काम करणाऱ्याांनी विनंती केली आहे. एकलव्य संघटनेचे ढवळे त्यांनी मला विनंती केली. निर्मला गावित आणि आमशा पाडवी यांनीही विनंती केली. आदिवासी समाजातील महिलेला राष्ट्रपती होण्याची संधी मिळत आहे. आम्हालाही ओळख मिळेल. त्यांना पाठिंबा दिला तर बरं होईल. त्यामुळे शिवसेना द्रोपदी मुर्मू यांना आम्ही पाठिंबा जाहीर करत आहोत. पण दबावामुळे पाठिंबा देत नाही. असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा