Uddhav Thackeray Team Lokshahi
राजकारण

ठाकरेंची तोफ धडाडणार! मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे घेणार जाहीर सभा

उद्धव ठाकरे 9 ऑक्टोबर रोजी ठाण्यात सभा घेणार

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या शिवसेना शिंदे गटात वाद सुरु असताना, दोन्ही गटाचे लक्ष आता येत्या पाच तारखेच्या दसऱ्या मेळाव्यावर आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कात होणार आहे. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी येथे पार पडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ठाण्यातील टेंभी नाका येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सभा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ठाण्यातील मुख्यमंत्री शिंदे यांच्या बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या टेंभी नाका येथे उद्धव ठाकरे 9 ऑक्टोबर रोजी ही सभा घेणार आहे. या जाहीर सभेनंतर राज्यभरात शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेला सुरुवात होणार आहे. महाप्रबोधन यात्रेदरम्यान उद्धव ठाकरे राज्यातील प्रमूख शहरात जाहीर सभा घेणार असल्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. या महाप्रबोधन यात्रेची सांगता कोल्हापुरातील बिंदू चौकात उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेनेच होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

दसरा मेळाव्यानंतर शिवसेनेचा पुढील प्लॅन समोर आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात 9 ऑक्टोबरला सभा घेणार आहेत. ठाण्यातील टेंभी नाका येथे संध्याकाळी जाहीर पार पडणार आहेत. या सभेनंतर राज्यभरात शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेला सुरुवात होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा

Sanjay Raut : मुंबईत आज साजरा होणार ‘मराठी विजय दिन’; संजय राऊतांनी सांगितली कार्यक्रमाची रुपरेषा

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांचीही हजेरी

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला