Shiv Sena-Congress meeting Nana Patole  team lokshahi
राजकारण

‘मातोश्री’वर शिवसेना-काँग्रेस नेत्यांची बैठक संपली, नाना पटोलेंचा सरकार टिकण्याचा दावा

मातोश्रीवर रात्री शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली

Published by : Shubham Tate

Shiv Sena-Congress meeting Nana Patole : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आता आठवडा पूर्ण झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. शिवसेना आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.आज ईडीने पत्राचाळ आणि पर्ल ग्रुप प्रकरणी संजय राऊत यांना समन्स पाठवला आहे. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर मंत्र्यांचे खाती हटविण्यात आली आहेत. तर शिवसैनिक ठीक ठिकाणी आक्रमक होत आहेत. (Shiv Sena-Congress meeting ends on Matoshri Nana Patole's government claims to last)

तर सरकार वाचवण्यासाठी राज्यातील नेते मोठ्या शर्तीचे प्रयत्न करताना दिसत आहे. अशातच आज सायंकाळी काॅंग्रेस (Congress) नेते नाना पटोले (Nana Patole) आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बैठक पार पडली. यानंतर नाना पटोलेंनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर रात्री शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. जवळपास तासभर ही बैठक चालली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडी सरकार स्थिर असल्याचा दावा केला आहे. तसेच आमच्याकडे बहुमत असल्याचा देखील दावा केला आहे.

तर दिसरीकडे बंडखोर आमदारांचा मुक्काम वाढला आहे. हॉटेल रेडिसन ब्लू अनिश्चित काळासाठी बुक करण्यात आले आहे. शिंदे गटाकडून हॉटेलचं बुकिंग पुन्हा वाढवलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 12 जुलै पर्यंत आमदारांचा मुक्काम गुवाहाटीमध्येच ? असल्याचे बोलले जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद