Shiv sena leader vijay shivtare allegations on ncp mp supriya sule 
राजकारण

Vijay Shivtare : ‘सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेवाचं दर्शन घेतलं’

शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांचा मटण खातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या फेसबुक पेजवरील देवदर्शनाचे चार फोटो शेअर केले आहेत.

Published by : Pankaj Prabhakar Rane

पुणे : राष्ट्रवादीच्या बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी काल मटण खाऊन महादेव मंदिरात दर्शन घेतलं, असा आरोप शिवसेनचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी केला आहे. मटण थाळीचा एक व्हीडिओ आणि सुप्रिया सुळे यांचे काही फोटो शिवतारे यांनी फेसबुकवर पोस्ट करत हे आरोप केले. सुप्रिया सुळे यांच्या या कृतीमुळे भावना दुखावल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, या आरोपानंतर आता पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील एका हॉटेलमध्ये मटण खाल्लं आणि नंतर देवदर्शन केलं. सुप्रिया सुळे यांनी महादेव आणि सासवडला सोपनकाक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, असं शिवतारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. शिवतारेंनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या फोटोत सुप्रिया सुळे यांनी बारामतीतील वडकी येथील महादेव मंदिराच्या बांधकामाची पाहणी करताना दिसत आहेत. महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर त्या ग्रामस्थांना संबोधित करतानाही दिसत आहेत. सासवडला त्या संत सोपानकाकांचेही दर्शन घेताना दिसत आहेत. तर व्हिडीओत एका हॉटेलात त्या मटण थाळीवर चर्चा करताना दिसत आहे. तसेच मी हीच थाळी खालल्याचं कार्यकर्त्यांना सांगताना दिसत आहेत.

फेसबुक पोस्ट करत शिवतारेंचे आरोप

खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी मटण खाऊन महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, असा गंभीर आरोप विजय शिवतारे यांनी केला आहे. त्यांनी फेसबुकवर सुप्रिया सुळे यांचा हॉटेलमधील एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओत सुप्रिया सुळे या ‘मी हीच थाळी खाल्ली’ असे म्हणताना दिसून येत आहेत.

शिवतारे यांनी पोस्ट करताना, आधी मटण खाल्लं. मग भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मग महादेव मंदिरात गेल्या. मग दिवे घाट ओलांडून सासवडला गेल्या. सासवडला संत सोपानकाकांचे दर्शन घेतले. येणेवरे ज्ञान देवो सुखिया जाहला, असं खोचक कॅप्शनही दिले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी