Eknath Shinde Team Lokshahi
राजकारण

आनंद दिघे गेल्यानंतर मला त्यांची संपत्ती विचारली - मुख्यमंत्री शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीकेसी मैदानावर आज दसरा मेळावा होत आहे

Published by : Sagar Pradhan

हे भाड्यानी आणलेले लोक नाहीत, मनाने आलेले लोक आहेत

तुम्ही प्रॉपर्टीचे वारसदार, आम्ही विचारांचे वारसदार

कटप्पा स्वाभिमानी होता, तुमच्या सारख्या दुटप्पी राजकारणी नव्हता.

मला कटप्पा म्हणतात, पण त्यांना हे माहित नाही कटप्पा स्वाभिमानी होता, तुमच्या सारख्या दुटप्पी राजकारणी नव्हता. अशी टीका शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

बर झाल मी सगळ्यांना कामाला लावलं, त्यांचा पट्टाही निघाला.तुम्ही वर्क फॉर्म होम राबवल आम्ही वर्क विदाउट होम राबवलं  

दाऊदचा हस्तक होण्यापेक्षा मोदी आणि शहांचा हस्तक असल्याचा मला सार्थ अभिमान

मला नेहमी मोदी आणि शहांचा हस्तक म्हणून हिणवल जात, मात्र दाऊदचा हस्तक होण्यापेक्षा मोदी आणि शहांचा हस्तक असल्याचा मला सार्थ अभिमान, ज्यांनी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले. त्यांचे विचार पुढे नेले.

पवारांनी काय सांगितले ते ही योग्य वेळ आली की जाहीर करेल

मुख्यमंत्री पदाबाबत काय ठरलं होत आता ते सांगणार नाही. माझ्यात तुमच्यात काय ठरल होत ते आता जाहीर करणार नाही? योग्य वेळ आली की जाहीर करेल. पवारांनी काय सांगितले ते ही योग्य वेळ आली की जाहीर करेल.

होय मी कंत्राटी मुख्यमंत्री 

राज्याचे कंत्राट योग्य व्यक्तीच्या हाती गेले आहे.

मुख्यमंत्री शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला भुरळ घातली, जगभर देशाचे नाव करता त्यांची टिंगल करता, गृहमंत्र्यांची टिंगल करता. ज्यांनी बाळासाहेबांच्या स्वप्न पूर्ण करणाऱ्याची तुम्ही टिंगल करता आहेत.

आम्हाला रिक्षावाला टपरीवाला म्हणणारे आता कुठे? आमच्या विरुद्ध बोलणाऱ्याच काय होत माहित आहे ना? मुख्यमंत्री शिंदेंचा संजय राऊतांना टोला 

ही काय कंपनी नाही, हि शिवसैनिकांच्या घामातून उभी राहिलेली शिवसेना आहे. शिवसेना कुणाच्या दावणीला बांधली जाणार नाही.

पीफआय आणि संघाची तुलना करताना लाज वाटली पाहिजे

बाळासाहेबांची आणि शरद पवार यांची मैत्री होती पण कधी युती केली नाही.

ही भूमिका घेताना वेदना झाल्या- मुख्यमंत्री शिंदे 

आम्ही जो निर्णय घेतला तेव्हा वाईट वाटल. मात्र अडीच वर्ष खदखद होती,त्याच गोष्टीचा तीन महिन्यांपूर्वी उद्रेक झाला.

आम्ही गद्दार नाही तुम्ही खरे गद्दार

शिवसेना ना उद्धव ठाकरेंची ना एकनाथ शिंदेंची ही शिवसेना फक्त आणि फक्त बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना. होय गद्दारी झाली? तुम्ही ज्या दिवशी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सोबत युती केली तेव्हाच गद्दारी झाली. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी झाली आहे.

तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली- मुख्यमंत्री शिंदे 

आमच्या भूमिकेला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. माध्यमांना सांगतो कॅमेरा वळून महाराष्ट्राच्या जनतेला हा अफाट जनसागर दाखवा. तुम्हाला आता कळल असेल खरी शिवसेना कोण आहे.हा प्रश्न आता पडणार नाही. बाळासाहेबांचे विचारांचे वारसदार कोण आहे हेही कळाल असेल. आजच्या गर्दीने सर्व प्रश्नांची उत्तर दिली आहे. तुम्ही बाळासाहेबांच्या विचारणा तिलांजली दिली. स्वतःच्या स्वार्थासाठी बाळासाहेबांचा विचार गहाण टाकला. तुम्ही तुमचा इमान सत्तेसाठी राष्ट्रवादीच्या हातात दिली. आम्ही ही भूमिका महाराष्ट्राच्या हितासाठी घेतली आहे. ते ही जाहीर भूमिका घेतली.

उद्धव साहेब तुमचे सर्व कुटुंब शिंदे साहेबांसोबत- रामदास कदम 

उध्दव साहेब मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे? तुमचे सर्व कुटुंब शिंदे साहेबांसोबत आहे. तुम्ही कुटुंबाला सांभाळू शकत नाही तर या महाराष्ट्राच्या कुटुंबाला जनतेला कस सांभाळाल. उद्धव ठाकरे यांची नीती संपवण्याची आहे. कोणी पुढे जात असेल तर त्याला कस संपवायचे हे उद्धव ठाकरे करत असता.

शिवसेना आम्ही नाही तर तुम्ही संपवली - गुलाबराव पाटील 

मेळाव्यात बोलताना गुलाबराव पाटील यांनी बोलताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचावर जोरदार निशाणा साधला. शोले चित्रपटाची डायलॉगबाजी करत कहा गया रे तिसरा, आता आहेत जेलमध्ये चक्की पिसिंग अन्ड पिसिंग अशा शब्दात यावेळी गुलाबराव पाटील यांनी राऊतांवर टीका केली आहे.

जयदेव ठाकरे शिंदे गटात   

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू जयदेव ठाकरे शिंदे गटाच्या मेळाव्यात उपस्थित. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे माझ्या आवडीचे. मला मागील काही दिवसात फोने येतात विचारले जातेय तुम्ही शिंदे गटात गेलात, त्यावेळी मी म्हणालो की, अरे हे ठाकरे कोणच्या गोठ्यात बांधील राहू शकत नाही.

मुख्यमंत्री शिंदेंकडून भव्य तलवारीचे पूजन 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बीकेसीच्या मैदानावर दाखल झाले असून त्यांनी दसऱ्यानिमित्त भव्य दिव्य अश्या ५१ फुटाच्या तलवारीचे पूजन केले आहे.

शहाजीबापू यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख

गुलाबराव, तुमच्याकडे फोन आहे का? तुमच्या पाया पडतो. त्या उद्धव ठाकरेंना फोन करा आणि दोन मिनिटं इथे येऊन जा म्हणावं. खरी कोणीत शिवसेना आहे तुला कळेल.अशी जोरदार टीका करत शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला आहे.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीकेसी मैदानावर आज दसरा मेळावा होत आहे. शिंदे यांनी शिवसेनेशी फारकत घेतल्यानंतर पहिल्यांदाच शिंदे गटाचा दसरा मेळावा होत आहे. यादरम्यान शिंदे गटाकडून मोठं शक्तीप्रदर्शन केलं जाणार असून आमचीच शिवसेना खरी असल्याचं दाखवण्याचा यावेळी प्रयत्न होणार आहे. त्यामुळे शिंदे या मेळाव्यात काय बोलतात याकडेही संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द