(Shivsena) आज शिवसेनेचा जाहीर मेळावा पार पडणार आहे. हा मेळावा दादरमध्ये होणार असून एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात नेते पद आणि इतर पदांसाठी नेमणूक होणार असल्याची माहिती मिळत आहे.
आज शिवसेनेच्या अंतर्गत निवड प्रक्रिया पाड पडणार असून यावेळी एकनाथ शिंदे सर्व नेत्यांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांना महत्वाची जबाबदारी देण्यात येऊ शकते. या मेळाव्यातून एकनाथ शिंदे काय बोलतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.