राजकारण

ठाकरे गट - शिंदे गटाचे भवितव्य ठरणार; आमदार अपात्रतेचा निकाल कुणाच्या बाजूने लागणार?

शिवसेना कुणाची आणि ठाकरे की शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार, याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

शिवसेना कुणाची आणि ठाकरे की शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार, याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल बुधवारी येणार असल्याची शक्यता आहे. यामुळे शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या आमदारांचे भवितव्य उद्या ठरणार आहे.

विधानसभा अध्यक्ष विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये निकाल वाचन करणार असल्याचे सांगितले जात आहे. १४ सप्टेंबर ते २० डिसेंबरदरम्यान झालेल्या मॅरेथॉन सुनावणीनंतर सुमारे ५०० पानांचे निकालपत्र तयार होत असल्याची माहिती मिळत आहे.

पक्ष कुणाचा आणि आमदार पात्रता ठरविण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. उद्या बुधवारी सायंकाळी चार वाजता निकाल लागणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे हा निकाल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : 6 तास उलटले राजा अजूनही चौपाटीवर! गणेश गल्लीचे कार्यकर्ते मदतीला धावताच राजाचा पाट सरकला

आशिया कप 2025 : भारताच्या नव्या जर्सीवरून पडदा उघडला, 23 वर्षांनी मोठा बदल

Pune Ganpati Visarjan 2025 : 27 तास उलटले अजूनही पुण्यात विसर्जन मिरवणुका सुरु; गणेश मंडळांच्या उच्छादा पुढे पोलिसही हतबल

Amravati Ganpati Visarjan : अमरावतीत गणपती विसर्जनाला गालबोट; 2 वेगवेगळ्या घटनेत नदीत बुडून दोघांचा मृत्यू