Sanjay Raut | shivsena | money-laundering case team lokshahi
राजकारण

संजय राऊतांना ईडीकडून दिलासा

कागदपत्रांसह हजर होण्याची विनंती ईडीनं स्वीकारली

Published by : Shubham Tate

Sanjay Raut money-laundering case : शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्राचाळ जमीन घोटाळ्या प्रकरणी आज 11 वाजता हजर होण्यास सांगितले होते. मात्र, अलिबागला मिटींग असल्याने संजय राउत आज हजर राहू शकत नाहीत तर राऊत हे दुसरी वेळ मागण्याची शक्यता आहे. संजय राऊतांना ईडीकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. कागदपत्र सादर करण्यास राऊतांनी मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार कागदपत्रांसह हजर होण्याची विनंती ईडीनं स्वीकारली आहे. (Shiv Sena MP Sanjay Raut seeks more time to appear before ED in money-laundering case)

घोटाळा म्हणून ओळखल्या जाणार्‍या 1,034 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करत आहे. एजन्सीने संजय राऊत, त्यांची पत्नी आणि बांधकाम कंपनी एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश वाधवान यांच्यावर सदनिका पूर्ण करण्याचा कोणताही हेतू नसताना चाळ प्रकल्पासाठी पैसे उकळल्याचा आरोप केला आहे.

आम्ही ईडीसमोर कागदपत्रे सादर करण्यासाठी 13-14 दिवसांचा वेळ देण्याची मागणी केली होती. मात्र, राऊत यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी किती दिवसांचा अवधी मिळाला हे लगेच स्पष्ट होऊ शकले नाही. गेल्या आठवड्यात मंत्री एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांच्या गटासह सुरतला गेल्यानंतर शिवसेनेतील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर राऊत यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.

अंमलबजावणी संचालनालय, केंद्रीय अन्वेषण ब्युरो आणि इतर केंद्रीय यंत्रणांच्या दबावामुळे शिंदे यांचा बंड झाल्याचा आरोप शिवसेना करत आहे. तुम्ही माझा शिरच्छेद केला तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्वीकारणार नाही," असे ते आसामच्या राजधानीत असलेल्या बंडखोर आमदारांचा संदर्भ देत म्हणाले.

ईडीच्या चौकशीचे काय?

ईडी चौकशीबाबत राऊत यांनी म्हटले की, याआधीपासून पक्षाचे काही कार्यक्रम ठरवण्यात आले आहेत. पक्षाच्या या बैठका, कार्यक्रमानंतर ईडी चौकशीसाठी जाणापर असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. मी कायद्याला मानणारा माणूस आहे. ईडीला वाटत असेल त्यांनी अटकही करावी. मला अटक केली तरी त्याची चिंता नसल्याचेही त्यांनी म्हटले. देशात स्वातंत्र्याचा दुसरा लढा सुरू असल्याचे राऊत यांनी सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली