थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Shivsena) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना पदाधिकारी नाराज असल्याची माहिती मिळत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांवर अन्याय होण्याची भीती वाटत असल्याची माहिती मिळत असून पक्षातील अनेक जणांना डावलले जात असून विरोधकांना मोठ केलं जात आहे, असा जिल्हाप्रमुखांचा पक्षातील नेत्यांवर आरोप आहे.
पदाधिकाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बैठकांपासून दूर ठेवलं जात असल्याचा आरोप देखील शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी केला आहे.
Summery
छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना पदाधिकारी नाराज
एकनाथ शिंदेंच्या नेत्यांना डावललं जात असल्यानं नाराजी
पदाधिकारी थेट एकनाथ शिंदेंकडे करणार तक्रार