राजकारण

...तर कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहायचं नाही; शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज

दसरा मेळाव्याच्या टीझरद्वारे शिंदे गटाला शिवसेनेचा इशारा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : दसरा मेळाव्यावरुन शिवसेना व शिंदे गटात चढाओढ सुरू आहे. आपआपली ताकद दाखविण्यासाठी शिंदे गट व शिवसेना सज्ज झाली असून दोन्ही गटाचे टीझर रिलीज झाले आहेत. तर, आज शिवसेनेचा आणखी एक टीझर रिलीज झाला आहे. शिवसेनेच्या ऑफिशिअल अकाउंटवर हा टीझर शेअर करण्यात आला आहे.

एक नेता, एक झेंडा, एक मैदान... एकनिष्ठ शिवसैनिकांचा.. पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळावा, अशी कॅप्शन शिवसेनेने पोस्टमध्ये दिली आहे. यात उध्दव ठाकरे यांच्या भाषणातील काही वाक्ये व्हिडीओमध्ये दाखवली आहेत. छत्रपतींची आपल्याला शिकवण आहे एकतर कोणाच्या पाठीत वार करायचा नाही. आणि जर कोणी पाठीत वार केला तर त्याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहायचं नाही, असा सूचक इशारा शिंदे गटाला व्हिडीओद्वारे दिला आहे.

तसेच, आज माझ्या हातात आज अधिकार म्हणून काहीच नाही. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मिळालेली एक शक्ती आहे. आणि ही शक्ती घेऊन मी पुढे चाललो व लढायला चाललो आहे. सगळ एकत्र येऊन या शिवसेनेवर तुटून पडणारे. मर्द असतो याच लढायची वाट बघत असतो आणि आम्ही याच लढाईची वाट बघतोय, असेही उध्दव ठाकरे भाषणात बोलताना दिसत आहेत. यावेळीही शेवटी वाजत-गाजत या पण शिस्तीत या, असे आवाहन उध्दव ठाकरेंनी केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा