shital mhatre | eknath shinde team lokshahi
राजकारण

शिवसेनेला खिंडार, शीतल म्हात्रेंचा शिंदे गटात प्रवेश

सेनेच्या पहिल्या नगरसेविका शिंदे गटात

Published by : Shubham Tate

shital mhatre eknath shinde : एकनाथ शिंदे यांनी नाराज असलेल्या शिवसेनेच्या आणि काही अपक्ष आमदारांना सोबत घेत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. तेव्हापासून राज्यात शिवसेनेला खिंडार पडलं आहे. आमदारांनंतर ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवलीतील नगरसेवकांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेनेला संघटनात्मक पातळीवरही धक्का बसला आहे. (shiv senas first corporator shital mhatre in eknath shinde group)

अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर आता सेनेच्या माजी महिला नगरसेविकाही शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. शीतल म्हात्रे दहिसरच्या माजी नगरसेविका आहेत. म्हात्रे यांच्या रुपाने शिंदे गटात जाणाऱ्या त्या पहिल्या नगरसेवक ठरल्या आहेत. म्हात्रे आज आठ वाजता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्या होत्या त्यावेळी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. काय तो दांडा, काय ते ढुं… असं म्हणत एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर टीका करणाऱ्या शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी देखील उद्धव ठाकरेंना जबरदस्त धक्का दिला आहे.

शिवसेना प्रवक्ते पदी शीतल म्हात्रे यांची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबईतील आमदारांपाठोपाठ आता नगरसेवक ही एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी व्हायला सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे समर्थक शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली शीतल म्हात्रे यांचा एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभाग झाल्याचं सांगितलं जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा