Shiv Sena leader and Municipal Corporation Standing Committee Chairman Yashwant Jadhav's house has been raided by the Income Tax Department. 
राजकारण

Shivsena Corporator Yashwant Jadhav | आता BMC मधील शिपायाच्या घरीही धाड टाकतील: संजय राऊत

Published by : Shweta Chavan-Zagade

शिवसेने नेते आणि महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने धाड टाकली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत असताना, महानगरपालिकेची (bmc) निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे आता केंद्रीय तपास यंत्रणा मुंबई महानगरपालिकेतील शिपायांच्या घरीही धाड टाकायला कमी करणार नाहीत, अशी खोचक टिका राऊत यांनी केली आहे.

यावेळी संजय राऊत (sanjay raut ) यांनी भाजपवर सडकून टीका केली. सध्या अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण सुरु आहे. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये केंद्रीय तपासयंत्रणा आणि राजभवनाचा गैरवापर सुरु आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

यावेळी संजय राऊत यांना यशवंत जाधव यांच्यावरील कारवाईविषयी विचारण्यात आले. त्यावर राऊत यांनी म्हटले की, मुंबई महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया लवकरच सुरु होईल. त्यामुळे आता केंद्रीय तपासयंत्रणा महापालिकेतील शिपायांच्या घरीही धाडी टाकू शकतात. महापालिकेतील अनेक शिपाई शर्टाच्या खिशावर धनुष्यबाणाचं चिन्ह लावतात. मराठी माणूस आणि शिवसैनिक असल्यामुळे ते धनुष्यबाणाचं चिन्हं लावतात. त्यामुळे उद्या त्यांच्या घरावरही धाडी पडू शकतात. केंद्रीय तपास यंत्रणांकडून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. २०२४ पर्यंत महाराष्ट्र, झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ आणि पंजाबला अशा कारवाया सहन कराव्या लागतील. भाजपचे नेते डर्टी पॉलिटिक्स करत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

भाजपाकडून नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी केल्या जाणाऱ्या आंदोलनासंबंधी बोलताना ते म्हणाले की, "कोणत्याही राजकीय फायद्यासाठी तपास यंत्रणांचा वापर करणार, आरोप करणार, कॅबिनेट मंत्र्याला अटक करणार आणि परत आंदोलनही करणार. मग मुख्यमंत्र्यांनाही कोणाचा राजीनामा स्वीकारायचा आणि स्वीकारायचा नाही याचा हक्क आहे".

"निवडणुकीचं राजकारण सुरु आहे, पण हे खूपच गलिच्छ राजकारण सुरु आहे. निवडणूक हारल्यानंतर किंवा सत्ता आली नाही किंवा तिथपर्यंत पोहोचू शकले नाही यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा तसंच राज्यपाल भवनाचा गैरवापर केला जात आहे," अशी टीका यावेळी त्यांनी केली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा